आजपासून करा देशातील पहिल्या ‘अंडर वॉटर मेट्रो’तून ‘सफर’, कोलकत्तामध्ये होतेय सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंडरवॉटर प्रवास करण्याचे लोकांचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRC) ने आपल्या पूर्व-पश्चिम प्रकल्पांतर्गत अंडरवॉटर मेट्रो बोगदा तयार केला आहे. या अंडरवॉटर मेट्रोचे आज उद्घाटन होणार असून कोलकातामध्ये हुगली नदीखाली बांधलेला हा बोगदा कोलकाताला हावडाशी जोडला जाणार आहे.

दोन टप्प्यात सुरू होते बांधकाम :
ही मेट्रो दोन टप्प्यात बांधली जात होती. कोलकाता मेट्रोचा पूर्व-पश्चिम प्रकल्प सुमारे १६ किमी लांबीचा असून तो सॉल्ट लेक स्टेडियम ते हावडा मैदानापर्यंत पसरलेला आहे. पहिला टप्पा सॉल्ट लेक सेक्टर -5 ते साल्ट लेक स्टेडियम दरम्यान ५.५ किमी लांबीचा आहे.या मार्गावर करुणमयी, सेंट्रल पार्क, सिटी सेंटर आणि बंगाल केमिकल मेट्रो स्टेशन आहेत. दुसरा टप्पा अंडरग्राउंड मेट्रोच्या 11 किमी लांबीचा आहे.

अनेक तज्ञांचा सल्ला
या बोगद्याच्या बांधणीत रशिया आणि थायलंडमधील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पाण्याची गळती रोखण्यासाठी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. पाणी गळतीपासून बचाव करण्यासाठी, सुरक्षा पातळीचे ३ स्तर तयार केले गेले आहेत. या बोगद्यात ताशी ८० किमी वेगाने मेट्रो ट्रेन धावू शकेल. दरम्यान, २००९ पासून या प्रकल्पाचे काम चालू आहे.

विद्यमान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या कार्यकाळातही हे काम झपाट्याने होत आहे. २०२१ मध्ये हि संपूर्ण लाईन तयार होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. अप आणि डाऊन लाईनवर इथे दोन बोगदे बांधण्यात येतील. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ८५७५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.