मस्तीखोर ‘चैत्या’ प्रेक्षकांना भावला… 

मुंबई : वृत्तसंस्था – नागराज मुंजळे आणि चित्रपटात नवीन प्रयोग हे समीकरण ठरलेलेच आहे. गेले कित्येक दिवसांपासून नागराजचा प्रत्येक चाहता त्याच्या नवीन सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशांनंतर नागराज मंजुळेंचा ‘नाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून  या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर तब्बल १४ कोटींची कमाई केली आहे. लहानपणाची आठवण करुन देणारा हा चित्रपट  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘नाळ  हा सिनेमा १६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अगदी सातच दिवसांतच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे.

नागराज मंजुळे म्हटलं की सिनेमा इतिहास रचणार यात शंकाच नाही आणि पुन्हा एकदा ते अधोरेखित झालं आहे. ‘नाळ’ या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात  १४ करोड रुपयांची कमाई केली असून विक्रम रचला आहे. या चित्रपटातून प्रथमच प्रमुख भूमिका साकारणाऱ्या नागराज मंजुळे यांच्यासह देविका दफ्तरदार आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांनी उत्तम अभिनय केला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच अनेक जण छोट्या  ‘चैत्या’च्या प्रेमात आहेत. हा चिमुरडा कोण आहे, हे जाणून घ्यायची उत्कंठाही रसिकांमध्ये होती. परिणामी, पहिल्याच आठवड्यात चित्रपटानं चांगली कमाई केली.

‘नाळ’ चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहेत. ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. चित्रपटातील संवाद खुद्द नागराज मंजुळे यांनी लिहिले आहेत. लहान मुलाचे विश्व आणि त्याची निरागसता या सिनेमात पाहायला मिळणार आहे.‘नाळ’ हा चित्रपट आठ वर्षांचा मस्तीखोर मुलगा चैतन्यवर आधारित आहेत. महाराष्ट्रातील दुर्गम भागात नदी किनारी वसलेल्या छोट्याशा गावात चैतन्य राहतो. श्रीनिवास पोकळेने चैतन्यची भूमिका साकारली आहे. तर चित्रपटात चैतन्यच्या वडिलांची भूमिका नागराज मंजुळे यांनी साकारली आहे. तर चैतन्यचे भावनिक विश्व, त्याचा खोडकर स्वभाव आणि शेवटी अनपेक्षित वळण, असे या चित्रपटाचे कथानक आहे.

‘आय sss  जाऊ दे न व…’ गाण्याचा रेकॉर्ड –
‘नाळ’ या सिनेमाचे  ‘जाऊ दे न व लोकांच्या  विशेष पसंतीस उतरले आहे. या गाण्यातील  लहान मुलगा प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यू ट्यूबवर हे गाणं आत्तापर्यन्त २. ५ मिलियन लोकांनी पहिल होत. तसेच अनेक लोक या गाण्याच व ट्रेलरच  व्हाट्सअप स्टेटस ठेवत आहेत.

हिंदी चित्रपटांच्या स्क्रीनची संख्या झाली कमी –
‘नाळ’ हा सिनेमा ३००  हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. सुबोध भावे याचा ‘…आणि काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही टिकून असला तरी ‘नाळ’ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. ‘नाळ’च्या प्रदर्शनानंतर हिंदी चित्रपटांच्या स्क्रीनची संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.