नियमित मासे खाल्ल्यानं आरोग्याला होतात ‘हे’ 5 मोठे फायदे ! जाणून घ्या

मासे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टीक असतात. यातून मोठ्या प्रमाणात शरीराला प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात. आज आपण मासे खाण्याचे शरीराला काय फायदे होतात याबद्दल माहिती घेणार आहोत.

1) फॅट्स – शरीराल प्रोटीन आणि व्हिटॅमिन प्रमाणे फॅट्सही गरजेचं आहे. याला गुड फॅट्सही म्हटलं जातं. माशांमधून तुम्हाला हे फॅट्स मिळत असतात. माशातून साल्मन, ट्राऊट, ट्युना, मॅकरेल, सार्डीन असे अनेक प्रकारचे फॅट्स मिळतात.

2) नैराश्य – आजकाल अनेकजण नैराश्येत जाऊन चुकीचं पाऊल टाकतात. परंतु जे लोक नियमित माशांचं सेवन करतात त्यांच्यात नैराश्येचं प्रमाण तुलनेनं कमी आहे. माशात ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. याचाही शरीराला खूप फायदा होतो.

3) गंभीर आजारांपासून संरक्षण – जर नियमित मासे खाल्ले तर तुमचं शरीर संतुलित रहातं डायबिटीस आणि रक्तदाबांसारख्या अनेक समस्यांपासून तुम्ही दूर राहता. शरीराच्या विविध अवयवानांही फायदा मिळतो. आठवड्यातून किमान 2 वेळा मासे खाल्ले तरी तुम्हाला अनेक लाभ मिळतात.

4) हृदयासाठी फायदेशीर – माशांचा हृदयासाठीही खूप फायदा होतो. नियमित मासे खाणाऱ्यांमध्ये हृदयरोग, हार्ट अटॅक, स्ट्रोक असे धोके तुलनेनं कमी असल्याचं सिद्ध झालं आहे.

5) व्हिटॅमिन डी चा खजिना – मासे व्हिटॅमिन डी चा खजिना आहेत. विविध जातीच्या माशांमध्ये व्हिटॅमिन डी आढळून येतं. व्हिटॅमिन डी तसेच ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे लहान मुलांमधील टाईप वन डायबिटीससारख्या आजारांवर फायदेशीर ठरतं. रोज जर मासे खाल्ले तर तुम्हाला व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवणार नाही.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like