Fish Oil Benefits | हिवाळ्यात हृदयरोगापासून डोळ्यांची दृष्टी वाढवण्यापर्यंत, ‘या’ 4 आरोग्य समस्यांमध्ये लाभदायक आहे माशाचे तेल; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Fish Oil Benefits | एका संशोधनानुसार, माशांमधील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड पोषणाचा एक चांगला स्रोत आहे, शिवाय ते अनेक आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड (Omega-3 Fatty Acid) हृदयासाठी, डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे (Fish Oil Benefits). तसेच ते मेटाबॉलिक सिंड्रोम बरे करण्यास मदत करते. हिवाळ्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोजच्या आहारात फिश ऑइलचा समावेश करा.

 

फिश ऑइलचे फायदे (Fish Oil Benefits) –

1. हृदय निरोगी ठेवा :
रोजच्या आहारात फिश ऑइलचा समावेश केल्यास हृदय (Heart) निरोगी ठेवू शकता. संशोधनानुसार, जे लोक मासे खातात त्यांना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी असतो.

 

2. कोलेस्टेरॉल :
फिश ऑइल शरीरात निरोगी एचडीएल कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढवून ट्रायग्लिसराईड्स 15 ते 30 टक्क्यांनी कमी करते. फिश ऑइलचे थोडे सेवन केल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

3. दृष्टी वाढवण्यासाठी प्रभावी :
फिश ऑइलमध्ये असलेले ऊकअ दृष्टीचे संरक्षण करण्यास मदत करते. ऊकअ डोळ्याच्या रेटिनामध्ये असते आणि निरोगी रेटिना कार्याला चालना देते.

 

4. त्वचेसाठी फायदेशीर :
वाढत्या वयानुसार त्वचेची (Skin) चमक कमी होते. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेचे जास्त नुकसान होते.
ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. दररोज फिश ऑइलची एक कॅप्सूल त्वचेचा पोत सुधारते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- fish oil is beneficial for heart and eye sight know more benefits fish oil benefits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Zilla Parishad Recruitment | जिल्हा परिषदांमधील 13 हजार 514 पदांची भरती प्रक्रिया रद्द, 20 लाख तरुणांना धक्का

Shivsena MLA Anil Parab | ‘साई रिसॉर्ट पाडणे आहे’ बांधकाम विभागाची वर्तमानपत्रात टेंडरसाठी जाहिरात

NCP MLA Jitendra Awhad | मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना सुप्रीम कोर्टाचा दणका, न्यायालयाने बजावली नोटीस