Fisheries Business | मत्स्य पालन करून व्हा लखपती, दरमहिना होईल 2 लाखाची कमाई; व्याज फ्री लोन आणि इन्श्युरन्ससह अनेक सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Fisheries Business | मत्स्य पालनात 25,000 रुपये वार्षिक खर्च करून तुम्ही सरासरी 1.75 लाख रुपये कमावू (Profitable business) शकता. सध्या काही शेतकरी भाजीशिवाय मासे पालन सुद्धा करत आहेत. सरकारसुद्धा मत्स्य पालन व्यवसायाला प्रोत्साहन (Fisheries Business) देत आहे.

अलिकडेच मासे पालन करणार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी छत्तीसगढ सरकारने यास कृषी (Agri) चा दर्जा दिला आहे.
राज्य सरकार मत्स्यपालन करणार्‍या शेतकर्‍यांना इंटरेस्ट फ्री लोनची (Interest free loan) सुविधा देत आहे.
सोबतच सबसिडी आणि मच्छीमारांसाठी विमा योजनासुद्धा सरकारकडून मिळते.

जाणून घ्या कशी होईल कमाई?

जर तुम्ही सुद्धा मत्स्य पालन व्यवसायात असाल किंवा तो सुरू करण्याचा विचार करत असाल तर यातील आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला बंपर नफा मिळवून देऊ शकते.
होय… मत्स्य पालनासाठी सध्या बायोफ्लॉक तंत्रज्ञान (Fish Farming Business by Biofloc Technique) खुप प्रसिद्ध होत आहे.
अनेक लोक या तंत्रज्ञानाचा वापर करून लाखो रूपये कमावत आहेत.

कसे काम करते हे तंत्रज्ञान

Biofloc Technique एका बॅक्टेरियाचे नाव आहे.
या तंत्रज्ञानाच्या मदतीने मत्स्य पालनात मोठी मदत होते.
यामध्ये मोठ-मोठ्या (सुमारे 10-15 हजार लीटर) टाक्यांमध्ये मासे टाकले जातात.
या टाक्यांमध्ये पाणी टाकणे, काढणे, त्यामध्ये ऑक्सीजन देणे इत्यादीची चांगली व्यवस्था असते.

बायोफ्लॉक बॅक्टेरिया माशांच्या विष्ठेला प्रोटीनमध्ये बदलतो.
ज्यामुळे मासे ते पुन्हा खातात, यामध्ये एक तृतीयांश खाद्याची बचत होते.
पाणी सुद्धा घाण होत नाही. मात्र, हे थोडे खर्चीक असले तरी नंतर यात नफा सुद्धा खुप मिळतो.

नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड (NFDB) नुसार, जर तुम्ही 7 टँकपासून तुमचा व्यवसाय सुरू केला तर तो सेटअप करण्यात तुमचे सुमारे 7.5 लाख रुपये खर्च होतील.
मात्र, तुम्ही तलावात मासे पाळून सुद्धा मोठी कमाई करू शकता.

 

2 लाखापेक्षा जास्त होत आहे उत्पन्न

एका छोट्या गावातील शेतकरी गुरबचन सिंह यांच्याकडे केवळ 4 एकर जमीन आहे.
त्यांनी ती विकसित करून 2 एकरमध्ये मत्स्य पालन सुरू केले.
त्यांनी व्यवसायाची सुरूवात एका तलावात मासे पालन करून केली.

सिंह म्हणाले, मी जवळपास 10 वर्षापूर्वी मासे पालनावर एक रेडिया कार्यक्रम ऐकला होता आणि पारंपरिक कृषी पद्धत सोडून काही नवीन करण्याचा विचार केला होता.
मी मोगा शहरात जिल्हा मत्स्य विभागाशी संपर्क केला.
मत्स्य अधिकार्‍यांनी मला मासे पालनावर पाच दिवसांचे ट्रेनिंग दिले.
गुरबचन आता अडीच एकरात मासे पालन करून 2 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न होत आहे.

 

Web Title : Fisheries Business | fish farming is the most profitable business you can earn 2 lakh rupees per month check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Silver Price Today | लागोपाठच्या घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवे दर

Best Investment Plan | ‘इथं’ तुम्हाला 1,000 रुपयांच्या बचतीवर मिळतील पूर्ण 18 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ सुरक्षित स्कीमबाबत सर्वकाही

Former MLA Mohan Joshi | ‘पूनावाला यांची जादा डोस देण्याची अजूनही तयारी, पण…’ भाजपचे करंटेपणामुळे डोस मिळेनात