कोल्हापूरात मच्छी व्यावसायिकांकडून पोलीसास धक्काबुक्की

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन

कोल्हापुरातील गडहींग्लज तालुक्यातील नेसरी येथे गुरुवारी (दि.२४) आठवडा बाजारात वाहतूक शिस्त लावण्यासाठी गेलेल्या पोलीसाला ३ मच्छी व्यावसायिकांनी शिविगाळ व धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या खाकी वर्दीची कॉलर फाडून जीवे मारण्याची धमकी दिली . याबाबतची फिर्याद स्वतः महेश दत्ताञय बांगर या पोलीसाने नेसरी पोलीसात दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस बांगर हे नेसरी – गावठाण मार्गावर पेट्रोलींग करीत होते त्यावेळेला आठवडा बाजारात मसणाईदेवी मंदिर परिसरात मच्छी विकणारे व्यावसायिक असिफ मस्तान बोजगार, जरउद्दीन मस्तान बोजगार व रमेजा मस्तान बोजगार( सर्व रा. गडहींग्लज) या तिघांना वाहतुकीस अडथळा होत असल्याने वाहने मागे घेण्यासाठी सांगितले. असे सांगताच तुम्ही कोण सांगणारे ? असे म्हणत बांगर या पोलीसाला धक्काबुक्की व शिविगाळ केली. तसेच त्यांच्या खाकी वर्दीची कॉलर फाडून जीवे मारण्याची धमकी दिली. दुपारी 12 च्या सुमारास हा प्रकार घडला. वरिल तिन्ही व्यावसायिकांच्या विरोधात नेसरी पोलीसात सरकारी कामात अडथळा व मारहाण संदर्भात गुन्हा नोंद झाला आहे.