खरा ‘क्रिश’ ! खोल नदीतून ‘झाळ्याशिवाय’ हाताने आणि तोंडाने पकडतो ‘मासे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाण्यातून जिवंत मासे पकडणारा ‘क्रिश’ मधील कृष्णाच्या भूमिकेत असलेला ऋतिक रोशन तुम्हाला सर्वांना माहिती असेल. परंतू उत्तर प्रदेशात हमीरपुर जिल्ह्यात देखील असाच प्रकार पाहायला मिळाला. या जिल्ह्यातील व्यक्ती देखील असाच यमुना नदीत उडी मारतो आणि दोन्ही हातात नदीच्या पाण्यातून थेट मासेच घेऊन बाहेर पडतो. फक्त दोन्ही हातात नाही तर तोंडात देखील हा व्यक्ती जीवंत मासे घेऊन नदीतून बाहेर येतो.

या व्यक्तीचे नाव आहे सुगर निषाद. सुगर फिल्मी अंदाजात कॅमेऱ्या समोर यमुना नदीत उडी मारतो आणि पाणीतून दोन्ही हातात जिवंत मासे घेऊन बाहेर येतो. सुगरने नदीत उडी मारली आणि बाहेर येताना दोन्ही हातात एक एक मासे आणि एक मासा तोंडात घेऊन बाहेर येतो.

या व्यक्तीला अशा प्रकारे मासे पकडण्याची सवय लागली आहे. तो लोकांच्या सांगण्यावरुन मासे नदीतून बाहेर काढतो. यमुना आणि बेतवा नदीच्या दरम्यान हमीरपूर जिल्हा मुख्यालयच्या मेरापूर भागात राहणाऱ्या 24 वर्षीय सुगर निषाद लहानपणापासून नदीवर पोहायला जातो.

सुगरला सुरुवातीपासून नदीत पोहण्याची सवय आहे या दरम्यान तो कोणत्याही जाळ्याशिवाय नदीतून मासे काढण्याचे शिकला. आता तो जगातील असा व्यक्ती झाला आहे जो नदीतून जाळ्याशिवाय दोन्ही हातात आणि तोंडात मासे पकडतो.

सुगर जेव्हा नदीच्या खोल पाण्यातून मासे काढतो तेव्हा नदीच्या किनारी थांबलेले मित्र त्यांच्या आवडीचे मासे त्याला पकडायला सांगतात. मोफत मासे मिळवून लोक देखील खूश झाले आहेत. सुगर निषाद ज्या प्रकारे नदीतून मासे पकडून बाहेर आणतो त्या प्रकारचे कृत्य फक्त सिनेमामध्ये पाहायला मिळतात. परंतू सुगरने हा कारनामा सत्यात उतरवून लोकांना आश्चर्यचकित केले आहे.

 

Visit : Policenama.com