PM मोदीचं ‘मिशन फिट इंडिया’ सुरू ! ‘या’ 5 गोष्टींमुळं होणार ‘हिट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार देशवासियांना सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पहिल्यांदा स्वच्छता, मग योग आणि आता फिट इंडिया. पंतप्रधान मोदी फिट इंडिया अभियानाची सुरुवात करणार आहेत. देशातील सामान्य नागरिक फिट राहावा असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारकडून मोठ्या स्तरावर हे अभियान राबवण्यात येणार आहे. शहरात, गावात लोकांना तंदरुस्त राहण्याचे फंडे सांगण्यात येतील. हे अभियान संपूर्ण कालावधीसाठी चालवले जाईल. यासाठी सरकार तयारीला लागले आहे.

1. मंत्रालयबरोबर सरकार सुरु करणार कार्यक्रम –

हे अभियान क्रिडा मंत्रालयाच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आले आहे, परंतू याअंतर्गंत सर्वच मंत्रालयांना मिळून काम करावे लागणार आहे. प्रसारण मंत्रालय याचे प्रसारण करेल. मानव संसाधन मंत्रालय शहर, ग्रामीण भागाला यात सहभागी करुन घेईल.

2. प्रसिद्ध लोकांच्या आधार जागृकता निर्माण करणार –

मोदी स्वत: लोकांना आवाहन करणार आहे. परंतू यात मंनोरजन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंना देखील ते सहभागी करुन घेतील. या अभियानात मेरी कॉम, राजनाथ सिंह, कॉम्रेड संगमा यांच्यासारखे दिग्गज व्यक्ती सहभागी होतील. त्यांनी या संबंधित ट्विट करत लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

3. अनेक स्तरावर होणार काम –

सरकार योगाला प्रोस्ताहन देण्यासाठी प्रयत्न करत आहेच परंतू दुसऱ्या बाजूला फिट इंडिया अभियान राबवत आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून मुलांना शिक्षण, ज्येष्ठांचे आरोग्य यासंबंधित योजना राबवणार आहे.

4. सरकार करणार प्रचार –

फिट इंडियाला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकार प्रसार माध्यमांचा वापर करणार आहे. टीव्ही, रेडिओ, डिजिटल माध्यमातून याचा प्रचार करण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थाकडून देखील जागृकता अभियान राबवण्यात येईल.

5. फिटनेसमध्ये भारत मागे –

आरोग्यावर GDP च्या 1 टक्के खर्च करण्यात येतो, तसेच सामान्य माणसाचे जास्तीत जास्त पैसे आजारावर खर्च होतात. लोकांमध्ये आरोग्याबद्दल आणि फिटनेस बद्दल जागृकता निर्माण करणे आवश्यक आहे. फिटनेसवर श्रीलंका, मालदीव, भूटान हे जास्त खर्च करतात. त्यांच्यापेक्षा भारतीय कमी खर्च करतात.

फिटनेस अभियानासाठी बॉलिवूड सज्ज –

मोदी सरकारच्या या फिटनेस अभियानासाठी बॉलिवूड सज्ज झाले आहे. अनेक कलाकर योग, फिटनेस संबंधित अनेक व्हिडिओ पोस्ट करत जागृकता निर्माण करत आहे.

बॉलिवूड कलाकर शिल्पा शेट्टीने एक व्हिडिओ शेअर करत लोकांना अभियानाला जोडण्यासाठी आवाहन केले आहे. त्यात ती म्हणाली की, आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला श्वास घेण्यास देखील वेळ नाही, म्हणूनच मी आवाहन करते की पीएम मोदींच्या फिट इंडिया अभियानात सहभागी व्हा.फिटनेसमुळे आयुष्य बदलते.

पायल रोहतगी आणि करण जौहर यांनी देखील या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे अभियान फिट ठेवण्यासाठी आणि लाइफस्टाईल बदलण्यासाठी लाभदायक ठरेल.

https://twitter.com/karanjohar/status/1166941734007377920

आरोग्यविषयक वृत्त –