‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी 71 व्या वर्षीदेखील दिसतात ‘टकाटक’ ! Share केलं ‘फिटनेस अँड ब्युटी’ सिक्रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी आजच आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. जरी त्या 71 वर्षांच्या झाल्या असल्या तरी त्यांचे सौंदर्य आजही कमी झालेले नाही. आजही त्यांनी आपला फिटनेस आणि सौंदर्य कायम ठेवलं आहे. त्यांना पाहून अजिबात वाटत नाही त्यांचं एवढं वय आहे. आपण आज ड्रीमगर्लच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेणार आहोत.

सायक्लिंग आणि योग-प्राणायम
हेमा मालिनी जीमला जात नाहीत परंतु 10-15 मिन त्या रोज सायक्लिंग करतात. याशिवाय त्या रोज 45 मिनिटे प्राणायम करतात. अनेक वर्षांपासून त्यांनी योगा करण्यात सातत्य ठेवलं आहे. हेच कारण आहे की, त्या आजही फिट आहेत. सर्व आसनं करण्यात त्या अगदी एक्सपर्ट आहेत.

डान्स
हेमा मालिनी क्लासिकल डान्सर आहेत हे तर सर्वजण जाणतात. डान्स हेदेखील त्यांच्या फिटनेसचे रहस्य आहे. त्या सांगतात की, त्या रेग्युलर क्लासिकल डान्सची प्रॅक्टीस करतात. त्यामुळे त्या एनर्जेटीक राहतात. याशिवाय यामुळे स्ट्रेसपासूनही बचाव होतो.

हेमा मालिनींचा डाएट प्लॅन
हेमा मालिनी आठवड्यातून दोन दिवस उपवास करतात. यावेळी त्या फक्त फ्रेश फ्रू़ट्स आणि नट्स खातात. शाकाहारी असल्याने त्यांच्या डाएटमध्ये कायम हिरव्या पालेभाज्या, फळं, सॅलड, आणि डाळींचा समावेश असतो. त्या रोज 2 कप ग्रीन टी देखील घेतात.

साखरेपासून दूर
एका मुलाखतीत बोलताना हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं की, त्यांनी साखर खाणं सोडून दिलं आहे. जेव्हा त्या आऊटींगासाठी बाहेर असतात तेव्हा त्या हॉटेलमध्ये सूचाना देतात की, गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी मधाचा वापर करा. एवढंच काय त्या चहामध्येही मध टाकून पितात. त्या जंक फूडपासूनही खूप लांब आहेत.

असं आहे डाएट रूटीन
मॉर्निंग-
कोमट पाण्यात मध आणि लिंबू

ब्रेकफास्ट- फळं, सॅलड, 1 ग्लास ज्यूस किंवा ग्रीन टी

लंच- 2 चपात्या, एक कटोरी डाळ, 2 भाज्या, भात, रसम

डिनर- भाजी, डाळ, चपाती किंवा भात(रात्रीचं जेवण त्या 8 च्या आधीच घेतात)

हेमा मालिनी यांच्या ब्युटी टीप्स
1)
कमीत कमी मेकअप-
एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, “सौंदर्य देवाने दिलेली भेट आहे. जी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माझी स्किन चांगली आहे कारण देवानी बनवली आहे. मी माझी स्कीन स्वच्छ आणि मेकअप फ्री ठेवण्याचा प्रयत्न करत असते.”

2) सुगंधी तेलाने मेकअप काढतात-
हेमा हेवी मेकअप काढण्यासाठी सुगंधी तेलाचा वापर करतात. यामुळे स्किनची चमकही कायम राहते.

3) भरपूर पाणी-
चेहऱ्यावरील चमक आणि तेज कायम ठेवण्यासाठी हेमा दिवसभरात कमीत कमी 8-9 ग्लास पाणी पितात. यामुळे बॉडी आणि स्किनमधील टॉक्सिंस बाहेर पडतात. यामुळे स्कीन ग्लो करते आणि हायड्रेट राहते.

केसांचं सौंदर्य
हेमा आठवड्यातून दोनदा केसांची चंपी करतात. यासाठी त्या खोबरेल तेलात आवळा, तुळस आणि कडुनिंबाचं तेल मिक्स करतात. या तेलाने केसांना मसाज देतात.

Visit : Policenama.com