‘लॉकडाऊन’ध्ये ‘विराट-अनुष्का’नं दिल्या ‘फिटनेस’ आणि ‘इम्युनिटी’ टीप्स !

पोलिसनामा ऑनलाइन –फिल्म अ‍ॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि तिचा पती टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांनी लॉकडाऊनमधील त्यांच्या शेड्युलचा खुलासा केला आहे. सोबतच त्यांनी काही फिटनेस टीप्सही चाहत्यांना सांगितल्या आहेत. सध्या लॉकडाऊनमध्य अनुष्का आणि विराट सोबतच आहेत. या काळातही त्यांनी आपली निरोगी जीवनशैली सोडली नाही.

लाईव्ह चॅट करत अलीकडेच या पावर कपलनं चाहत्यांसोबत संवाद साधला आहे. जाीवनात सकारात्मक बदल कशा प्रकारे आणावेत आणि लॉकडाऊनध्ये निरोगी कसं रहावं हेही त्यांनी सांगितलं आहे. ते वेगळं असं काहीच करत नाहीत असं सांगत अनुष्का म्हणते, “विराट आणि मी अशा लोकांपैकी आहोत जे डाएटवर विश्वास ठेवतात. आमची जीवनशेली एकच आहे जी खूप निरोगी आहे. आम्ही नेहमी असेच होतो.”

डाएट आणि व्यायामाबद्दल अनुष्का म्हणाली, “काही गोष्टी खाणं आम्ही मुद्दाम टाळतो. जास्त हेल्दी पदार्थ खाण्यावर आमचा भर असतो. कारण पचायला सोपं जातं. इम्यनिटी वाढते.आम्ही सकाळी उठल्यानंतर हळदीचं सेवन करतो. काली मिर्च आणि आद्रकचा चहाही घेतो. खूप जास्त पाणीही पित असतो.”

विराट सांगतो की, मी अनुष्कानं धैर्य ठेवायला शिकलो आहे. मी आधी असा नव्हतो. तिला पाहून मला परिस्तितीशी लढण्याची प्रेरणा मिळाली.”