Fitness Resolution | 2022 मध्ये तुमचा फिटनेस संकल्प कायम राखण्यासाठी मदत करतील ‘या’ टिप्स अँड ट्रिक्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fitness Resolution | सध्या फिट राहणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला आतापर्यंत चांगलेच समजले असेल. त्यामुळे या वर्षी फिट राहण्याचा संकल्प केला असेल, तर तो टिकवण्यासाठी या टिप्स फॉलो करा. (Fitness Resolution)

 

प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात काही नवीन संकल्पाने होते, ज्यामध्ये फिटनेस सर्वात वर असतो, पण जसजसा वेळ जातो तसतसे फिटनेस दिनचर्येचे पालन करणे अवघड होते, ज्यामुळे तो संकल्प अनेकदा चुकतो. कारण आपण तो मनोरंजक ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. आपण अशा पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही वर्षभर ही दिनचर्या कायम ठेवू शकता.

 

वेळ निश्चित करू नका
सकाळीच वर्कआऊट करणे फायदेशीर आहे, ही गोष्ट मनातून काढून टाका. संध्याकाळ सुद्धा व्यायाम करण्यासाठी योग्य आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे व्यायाम करण्यापूर्वी 1 तास काहीही खाऊ नका आणि नंतर अर्धा तास काहीही खाऊ नका.

एक आनंददायक वर्कआऊट निवडा
कंटाळवाणा आणि थकवणारा वर्कआउट करण्याऐवजी, अशा वर्कआउटचा दिनक्रमात समावेश करा ज्याचा आनंद मिळेल, जसे की डान्स, सायकलिंग, स्विमिंग इ. आवडीच्या अ‍ॅक्टिव्हिटी करताना 30 ते 45 मिनिटे किंवा 1 तास कधी निघून जातो हे कळत नाही. त्यामुळे खूप कॅलरीजही बर्न होतात. (Fitness Resolution)

 

नवीन वर्कआउट्स ट्राय करा
जर तुम्हाला जिममध्ये जाऊन तेच वेट ट्रेनिंग, लेग वर्कआऊट्स आणि अ‍ॅब्ज एक्सरसाईज करून कंटाळा आला असेल, तर काही नवीन वर्कआउट्स करून पहा. आजकाल YouTube वर अनेक पर्याय आहेत. जो वर्कआऊट तुमच्या रूटीनमध्ये फ्रेशनेस आणेल तो शरीर आणि मनासाठी चांगला ठरेल.

 

फिटनेस अ‍ॅप डाउनलोड करा
तुम्ही फिटनेस रू टीन टिकवून ठेवण्यासाठी फिटनेस अ‍ॅप डाउनलोड करा, जेणेकरून वर्कआउट चुकण्याची शक्यता खूपच कमी होईल. तुम्ही ते कुठूनही अ‍ॅक्सेस करू शकता. स्टॅमिनानुसार एक्सरसाईज निवडू शकता. पण, कोणत्याही गंभीर आजाराने, शस्त्रक्रियेने किंवा दुखापतीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारची शारीरिक क्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

डाएटिंग ऐवजी सकस खा
लवकर स्लिम-ट्रिम फिगर मिळवण्यासाठी डाएटिंग पर्याय निवडू नका.
कारण ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. थोडे खा आणि हेल्दी खा.

आराम करा

रोज व्यायाम करायचा असेल तर त्यासाठी विश्रांतीही तितकीच महत्त्वाची आहे.
विश्रांतीशिवाय दीर्घकाळ वर्कआऊट रिजिम फॉलो करू शकत नाही.

 

 

Web Title :- Fitness Resolution | these tips and tricks will help you maintain your fitness resolution in the year 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

How To Earn-Save | कसे कमवायचे, कशी बचत करायची, कुठे किती खर्च करायचा, ‘या’ एक्सपर्टच्या टिप्स तुमच्या कामी येतील

 

Side Effects Of Room Heater | थंडीत रूम हीटर वापरण्यापूर्वी ‘ही’ गोष्ट जाणून घ्या, नाहीतर…

 

Nitin Gadkari | वाढत्या अपघातांबाबत नितीन गडकरींचे धक्कादायक विधान; म्हणाले – ‘देशातील पुलांची एक्स्पायरी डेट नसल्याने अपघात आणि मृत्यू’