जाणून घ्या, मलायकाच्या ‘फिटनेस’चे गमक, वयाच्या 45व्या वर्षीही दिसते एकदम ‘HOT’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या स्मार्टनेस आणि फिटनेस मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मालयका ४५ वर्षाची आहे. या वयातही ती अतिशय सुंदर दिसते. जणू एखाद्या पंचविशीतील तरुणीला लाजवेल अशीच. जाणून घेऊयात तिच्या फिटनेसचे आणि सौंदर्याचे गमक काय आहे.

इंस्टाग्राम वरील पोस्ट होत आहे व्हायरल
मागच्या काही दिवसांपूर्वी मालयकाने इन्स्टाग्रामवर प्लँक करतानाचा आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती साइड प्लँक करताना दिसत आहे. या फोटोत ती सर्वात कठीण अशी साइड प्लँक एक्सरसाइज अगदी सहजतेने करत असल्याचे दिसत आहे. आजकाल मलायकाचा हा फोटो समाजमाध्यमांवर खूपच व्हायरल होत आहे. त्यामुळे तिच्या फिटनेसचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.

दररोज १० मिनिटे प्लॅंक करणे उपयोगाचे ठरू शकते
प्लँक हा एक बॉडी वेट व्यायाम प्रकार आहे. फिट राहण्यासाठी प्लँक व्यायाम प्रकार खूप महत्वाचा आहे. यामुळे पोटाचे मसल्स चांगले मजबूत होतात. या व्यायामामुळे पाठीच्या कण्यावर आणि पार्श्वभागावर ताण पडत नाही. यामुळेच प्लँक करताना कोणतीही दुखापत होण्याचा धोका कमी असतो. नियमितपणे प्लँक केल्याने मोठ्या प्रमाणात शरीरातील कॅलरी बर्न होतात. तसेच शरीरातून घाम येतो. यामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात. तसेच पचनक्रिया सुधारते. इत्यादी कारणांमुळे दररोज किमान १० मिनिटे प्लँक करणे अतिशय महत्वाचे आहे.

शरीरात योग्य संतुलन साधले जाते
शरीराचं संतुलन व्यवस्थित रहावे अशी जर आपली इच्छा असेल तर प्लँक एक्सरसाइज आपली चांगलीच मदत करू शकते. कोणतीही व्यक्ती १ मिनिटापेक्षा जास्त एका पायावर उभी राहू शकत नाही. परंतु, प्लँक केल्याने आपल्या मांसपेशी अतिशय मजबूत होतात. हा व्यायाम प्रकार केल्याने जास्त काळासाठी शरीर संतुलित राहू शकते. यामुळे कोणतीही व्यक्ती डोक्यावर आणि एका पायावर जास्त वेळ सहज उभं राहू शकते. यामुळे आपली कंबर, खांदा, तसेच पाय मजबूत राहण्यास मदत मिळते. तसंच आपलं शरीर अधिक लवचिक होत असतं. स्नायूंवर येणाऱ्या ताणामुळे मोठ्या प्रमाणात अंगदुखी होते. सतत बसल्यामुळेही स्नायूंवर ताण येतो. स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी प्लँक करा. त्यामुळे प्लॅंक हा एक अतिशय महत्वाचा व्यायाम प्रकार आहे.

फिटनेस फंडा
व्यवस्थित व्यायाम केल्यामुळे शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. मलाईका अरोरा देखील आपले सौंदर्य खुलून दिसण्यासाठी नियमित हे व्यायाम प्रकार करत असते. त्यामुळेच ती वयाच्या ४५ व्या वर्षीसुद्धा एखाद्या पंचविशीतील तरुणीला लाजवेल असे आपले फिटनेस मेंटेन करू शकली आहे. तर हे आहे मालयकाच्या सौंदर्याचे गमक आहे.

 

 

You might also like