Fitness Tips : फिट आणि आरोग्यदायी राहण्यासाठी लावा ‘या’ 12 सवयी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – शरीराला फिट ठेवणे सोपे काम नाही. घरचे जेवण, चांगली झोप आणि व्यायामासारख्या गोष्टींना बराच वेळ खर्च होतो. परंतू काही अशा गोष्टी आहेत ज्या १ मिनीटांपेक्षाही कमी केल्याने तुम्ही फिट राहू शकता.

सकाळी उठून पाणी पिणे
सकाळी उठल्यानंतर चहा अथवा कॉफी घेण्याआधी एक मोठा ग्लास पाणी प्या. रात्रभर झोपून उठल्यानंतर शरीर डिहायड्रेट राहते. सकाळी उठून पाणी आल्याने फक्त शरीराला ऊर्जा मिळते. तसेच बुद्धी आणि किडनीसाठी पाणी पिणे फायदेशीर आहे. सकाळी एक ग्लास पाणी पिल्याने शरीर ऍक्टिव्ह राहते.

दातांचे फ्लॉसिंग
दातांची काळजी घेण्याची सर्वात चांगली पद्धत फ्लॉसिंग आहे. दातांच्या फटींमध्ये अन्न राहते. ज्यामुळे तोंडात बॅक्टेरिया होतात. फ्लॉसिंगमध्ये दात पातळ धाग्याने स्वच्छ केले जातात. त्यासाठी धाग्याला दोन दातांमध्ये घालून हलक्या हातांनी दातांवर खालच्या दिशेने घासले जाते. त्यामुळे दातांच्या आत असलेली घाण निघून जाते. हे करण्यासाठी सवयीनंतर १ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागू शकतो.

माऊथवॉशने गुळण्या करा
३० सेकंदापर्यंत चांगलया माऊथवॉशने गुळण्या केल्याने तोंडातील बॅक्टेरिया मरून जातील. कोणत्याही वेळेत तुम्ही हे करू शकता. आरोग्य तज्ञांच्या मतानुसार, झोपण्याआधी माऊथवॉशने गुळण्या करणे अधिक फायदेशीर आहे. झोपताना तोंड सुखते आणि बॅक्टेरिया दात आणि हिरड्यांचे नुकसान करतात. त्यामुळे माऊथवॉशने गुळण्या करून झोपणे चांगले आहे.

प्रोटीनयुक्त आहार
‘इट मोर प्लांट्स’ या पुस्तकाची लेखिका डेसीरी नीलसन यांनी वूमन डे वेबसाईट बनवले आहे. ‘प्रोटीनयुक्त आहार केल्याने ब्लड, शुगर नियंत्रित राहते, शरीराला ऊर्जा मिळते, लवकर भूक लागत नाही आणि मूड फ्रेश राहतो’. प्रोटीनयुक्त आहार हा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

कार्बोहायड्रेट फूड
हेल्थ एक्स्पर्टसच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही ब्रेड, पास्ता अथवा बटाटा यासारख्या कार्बोहायड्रेट फूडचे सेवन करत असाल तर त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल अथवा व्हिनेगर घालून सेवन करा. या दोन्ही गोष्टी कार्बच्या ग्लायसेमिक प्रभाव कमी करते. त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.