मलायका अरोराचा खास ‘फिटनेस फंडा’ ! फिगर होईल ‘हॉट अ‍ॅण्ड स्लिम’, जाणून घ्या 7 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवुडमध्ये फिटनेस क्विन म्हणून ओळखली जाणार्‍या मलायकाने आपल्या चाहत्यांना काही फिटनेस दिल्या आहेत. परफेक्ट जीम लुक आणि फिगरमुळे नेहमीच चर्चत असलेल्या मलायकासारखी हॉट अ‍ॅण्ड स्लिम फिगर हवी, असे ज्या महिलांना वाटत असेल त्यांनी या टिप्स नक्की फॉलो कराव्यात. वय जास्त असूनही मलायकाने स्वताला खुप आकर्षक प्रकारे मेन्टेंन ठेवले आहे.

मलायकाने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांसाठी ट्विटरवर फोटो शेअर करत स्टेप बाय स्टेप उर्ध्व मुख श्वानासन करण्याची पध्दत सांगितली होती.

हे योगासन असे करा…

1 सर्वप्रथम जमिनीवर झोपा.

2 मग आपल्या पायांना स्ट्रेच करा.

3 पाय असे स्ट्रेस करा की पायांची बोटं जमीनीला टेकायला हवीत.

4 छाती आणि बोटंसुध्दा पसरवण्याचा प्रयत्न करा.

5 श्वास घ्या. हातांवर जोर देऊन स्वतःला वरच्या बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करा.

6 हात आणि कोपर सरळ रांगेत ठेवा.

7 शक्य असल्यास पोट आणि मांड्यांना सुद्धा वर उचलण्याचा प्रयत्न करा

हे आहेत फायदे

1 थकवा आला असेल तर ताजेतवाने वाटते.

2 स्पाईन आणि पाठीचे मणके मजबूत होतात.

3 शरीरात रक्तवाहीन्या सक्रिया होतात त्यामुळे रक्ताभिसण सुरळीत होते.

4 शरीराला आकार आकर्षक होतो.

5 छाती आणी मांडयांच्या स्नायूंसाठी फायदेशीर.

6 हात आणि मनगट मजबूत होतात.

7 वजन कमी होते.