पावसाळ्यात घरातच करा वेट लॉस, ‘हे’ 6 ‘वेट लॉस ड्रिंक्स’ रिकाम्या पोटी प्या

पोलिसनामा ऑनलाइन – हंगामी फळे आणि भाज्यांचा ताजा ज्यूस प्यायल्याने विविध प्रकारची पोषक तत्व शरीराला मिळतात. मिनरल, व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटीऑक्सीडेंट्सची दैनंदिन गरज यातून पूर्ण होते. शिवाय मेटाबॉलिज्म वाढते आणि वेट लॉस होते. विविध संशोधनात सांगितले आहे की, फायबरमुळे फॅट बर्न होते आणि वेट लॉसमध्ये मदत होते. कॅलरीज बर्न करण्यासाठी आणि वेट लॉससाठी भाज्या आणि फळांचा ज्यूस पिणे लाभदायक आहे. या ज्यूसबाबत जाणून घेवूयात.

1 संत्र्याचा ज्यूस :
संत्रे वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. यास अँटी-कॅलरी फ्रूटसुद्धा म्हणतात. कारण यामध्ये खुप कमी कॅलरीज असतात. हा ज्यूस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

2 कारले :
कारले कडू असले तरी याचा ज्यूस प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हा ज्यूस प्यायल्याने लिव्हरद्वारे अशा बाईल अ‍ॅसिड्सची निर्मिती होते, जे फॅट मेटाबॉलिज्म वाढवतात. लो-कॅलरी फूड असल्याने वजन नियंत्रणात राहते.

3 काकडी :
यात पाणी भरपूर असल्याने शरीर हायड्रेटेड राहते. तसेच लो-कॅलरी फूड असल्योन वेट लॉस डायट म्हणून उपयोगी आहे. काकडीचा ज्यूस प्यायल्याने पोट खुपवेळ भरल्यासारखे वाटते, यामुळे वजन कमी होते.

4 पायनापल जूस :
अननसाच्या ज्यूसमध्ये खुप पोषक तत्व असतात. वर्कआउटनंतर हा ज्यसू प्यायल्यास खुप फायदे होतात. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ब्रोमिलियन नावाचे तत्व असते, ज्यामुळे शरीरावरील सूज कमी होते.

5 डाळिंबाचा ज्यूस :
हा ज्यूस नियमित घेतल्यास वजन कमी होते. यात अँटीऑक्सीडेट्स आणि पॉलिफेनॉयल्स असतात. यामुळे हा मेटाबॉलिक रेट वाढवतो आणि भूख कमी करतो. शिवाय फॅट बर्न करण्यासाठी मदत करतो.

6 कलिंगड :
गोड लाल कलिंगडमध्ये अमिनो अ‍ॅसिड्स आणि आर्जिनिन नावाचे पोषक तत्व असते, ज्यामुळे फॅट बर्न होते.