जीम वर्कआऊटनंतर प्या ‘चॉकलेट मिल्क’ ! होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – जीम वर्कआऊटनंतर अनेकजण प्रोटीन पावडरचं सेवन करतात तर काहींना एक हेल्दी ड्रींक हवं असतं. यासाठी तुम्ही चॉकेलट मिल्कचं सेवनही करू शकता. याचा फायदाही होतो. चॉकलेट मिल्क कसं बनवायचं आणि याचे शरीराला काय फायदे होतात याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

स्वत:च बनवा चॉकलेट मिल्क
– एक ग्लास दूध घ्या
– यात एक चमचा चॉकलेट सीरप टाका.
– तुम्ही कोणतंही डार्क चॉकलेटदेखील वापरू शकता.
– हे मिश्रण नीट एकत्र करा. तुमचं चॉकलेट मिल्क तयार आहे.

सतत 3 महिने जर तुम्ही याचं सेवन केलं तर तुमची बॉडी एकदम मजबूत बनेल. या हेल्दी ड्रिंकमध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट असतात. यामुळं बॉडी रिपेअरसाठी खूप मदत होते आणि स्नायू देखील मजबूत होतात.

चॉकलेट मिल्कचे आरोग्यदायी फायदे
– शरीलाला भरपूर ताकद आणि एनर्जी मिळते. अॅथलिट याचं सेवन जास्त करतात.
– बॉडी लगेच रिचार्ज होते
– शरीर मजबूत होतं.
– वर्कआऊटनंतर याचं सेवन केलं तर वेगानं बॉडी बनण्यास मदत होते.
– यानं थकवाही लवकर जातो, स्विमर आणि रनर यांच्यासाठी याचा खूप फायदा होतो.