नक्षल कनेक्शन : आरोपींच्या नजरकैदेत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून देशाच्या विविध भागातून अटक करण्यात आलेल्या एल्गार परिषदेशी संबंधित पाच संशयितांना १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान या पचही जणांना १७ सप्टेंबर पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’37fb29aa-b661-11e8-b3fd-aff4315a6e47′]
पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार, नक्षल कनेक्शन आणि बेकायदेशीर व्यावहाराच्या आरोपांखाली या ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात २८ ऑगस्टला त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, वेर्नोन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा यांचा समावेश आहे.