विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

चाकण : पोलीसनामा ऑनलाईन

चाकण येथे राहणाऱ्या एका विवाहितेला चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरा, नणंद व दीर यापाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खराबवाडी ( ता.खेड ) येथील पवार वस्तीवर राहणाऱ्या प्रगती रवी भालेराव (वय २१, रा. खराबवाडी, चाकण, मुळगाव कोरनुळ जि. लातूर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती पती रवी निवृत्ती भालेराव, सासरे निवृत्ती गंगाराम भालेराव, सासू कमल निवृत्ती भालेराव, दीर राहुल निवृत्ती भालेरावव नणंद सुकेशनी सटवाजी काळे या पाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा मानसिक,शारीरिक छळ करत होते.विवाहितेने काही दिवस हा त्रास सहन केला. परंतु, त्रास वाढल्याने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेची शहानिशा करुन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.