‘या’ फळाचे सेवन केल्यास होतील 5 आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या फळांच्या टोपलीत आणखी एक छोटेसे फळ दिसून लागले आहे. वर्षात काही महिनेच मिळणारे हे फळ आकाराने भलेही छोटे असले तरी गुणांनी कुणाच्याही मागे नाही. आम्ही ‘बोर’ या फळाबाबत बोलत आहोत. बोराचे फळच नव्हे, तर त्याची पाने, साल, गोंद इत्यादींमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. हे त्वचेच्या देखभालीसाठी उत्तम आहे. जाणून घेवूयात छोट्या बोराचे मोठे फायदे.

हे आहेत फायदे : 

1) लिव्हरच्या समस्या :
बोर हे अँटी-ऑक्सीडेंट्सचा खजिना आहे. लिव्हरच्या समस्यांवर हे खुप लाभदायक ठरते.

2) हाडांची मजबूती :
यातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिनमुळे हाडे मजबूत होतात. हाडांमध्ये वेदना होत असतील तर याचा वापर जास्त करू नका.

3) चमकदार त्वचा :
बोराचे सेवन केल्याच त्वचा चमकदार होते. यामध्ये अँटी-एजिंग एजन्ट असतात.

4) पचनक्रिया :
याच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते.

5) बद्धकोष्ठता :
बोराचे नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होते.