नेपाळमधील 14 तबलीगींना मशिदीत ‘आसरा’ दिला, नगरमध्ये 5 जणांवर FIR

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच ‘तबलिगी जमात’च्या मेळाव्याला दिल्लीतील निजामुद्दीन येथे अनेकांनी हजेरी लावली आणि यातील बरेच लोक कोरोना पोझिटीव्ह असून ते देशभर पसरले आहेत. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ माजली आहे. अशा लोकांना देशभर शोधून काढण्याचे आणि त्यांच्यावर उपचार करण्याचे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरु आहे. या लोकांमध्ये देश तसेच विदेशातील लोकांचा देखील समावेश आहे. दरम्यान नेपाळमधील तबलीघी जमातीच्या १४ जणांना आसरा दिल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संगमनेर मधील मोमीनपुरा भागात तपासणी

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , नेपाळमधील तबलीग जमातीच्या १४ जणांना संमनेरमध्ये आसरा देण्यात आल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या १४ जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या १४ जणांना आसरा देणाऱ्या मोमीनपुरा भागातील ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या १४ जणांसह मोमीनपुरा भागातील या पाच जणांची आणि त्यांच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. हे लोक करोनाबाधित आहेत की नाही? याचाही तपास करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, नेपाळमधील तबलीग जमातीच्या लोकांना संगमनेरमध्ये आसरा देण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

करोनाबाधिताचा रिपोर्ट निगेटिव्ह

दरम्यान, नगरमध्ये आढळलेल्या दुसऱ्या करोनाबाधिताचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. १४ दिवस त्याला क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्याची आणखी एक चाचणी करण्यात आली आहे. हा रिपोर्टही निगेटिव्ह आल्यास त्याला घरी सोडण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यभरात नवे ८१ कोरून पोझिव्ह रुग्ण

राज्यभरात ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या थेट ४१६ झाली आहे. पुण्यात सहा, पिंपरी चिंचवडमध्ये तीन, मुंबईत ५७, अहमदनगरमध्ये नऊ, ठाण्यात पाच, बुलढाण्यात १ असे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ४१६ वर गेली आहे. महाराष्ट्राच्या काळजीत भर घालणारी ही बातमी ठरली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत ४२ रुग्णांना डिस्चार्ड देण्यात आला आहे असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like