लासलगाव रेल्वे स्थानकावर मालगाडीचे 5 डबे घसरले

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव रेल्वे स्टेशनमध्ये लूप लाईन जवळ रविवारी सकाळी ८ वाजता मालगाडीचे डबे लोहमार्गावरून घसरल्याची घटना घडली. सदरची मालगाडी ही खडी भरण्यासाठी लासलगाव रेल्वे खरी डेपोजवळ येत असताना पाच डबे घसरले असून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ या ठिकाणी दाखल झालेले आहे.
 Railway station
लासलगाव रेल्वे स्थानकावर पस्तीस मालगाडीचे डबे असलेली ही रेल्वे खडी भरण्यासाठी जात असताना पाच बोगी या रेल्वे रुळावरुन घसरलीचे निदर्शनास आले मात्र, ही मालगाडी कशामुळे घसरली हे स्पष्ट झालेले नाही. रेल्वे इंजन पासून क्रमांक 1,5, 14,15,16 या बोगी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सदरची मालगाडी ही लोक लाईन लागत असल्याने वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

You might also like