Coronavirus : ‘कोरोना’मुळे ‘या’ 5 देशात सर्वाधिक मृत्यू, मृत्यूंच्या संख्येत दिवसेंदिवस ‘वाढ’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात थैमान घातले आहे. चीनमध्ये याचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी युरोपीय देशामध्ये याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून दिवेसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेत. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूंचाही आकडा वाढत आहे. या महाभयंकर रोगामुळे आत्तापर्यंत 4 लाख 50 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 20 हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव युरोपीय देशांमध्ये झाला आहे. या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. तर सर्वाधिक मृत्यू याच देशात झाले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरातील 180 देशांमध्ये झाला आहे. तर कोरोनामुळे पाच देशांमध्ये हाहाकार माजवला असून या पाच देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.

इटली : इटलीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक प्रमाण आहे. सहा कोटी लोकसंख्या असलेल्या आणि निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या या देशात कोरोना बाधितांची संख्या 74 हजार 386 वर पोहचली आहे. तर 7 हजार 500 पेक्षा अधिक लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला असला तरी समाधानाची बाब म्हणजे 9 हजार जण या रोगापासून बरे झाले आहेत. चीनमधील वुहान शहरामुळे इटलीमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे.

स्पेन : चार कोटी लोकसंख्या असलेल्या युरोपीय देशापैकी एक असलेल्या स्पेनमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे स्पेनमधील मृतांची संख्या चीनपेक्षा अधिक आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 47 हजार 611 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 3 हजार 445 लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तसेच 5 हजार 367 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.

चीन : कोनाची उत्पत्ती चीन या देशातून झाली आहे. कोरोनाचे मुख्य केंद्र चीन असून चीन प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. चीनने या महाभयंकर रोगावर तीन महिन्यात नियंत्रण मिळवले आहे. चीनमध्ये आतापर्यंत 81 हजार 218 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 3 हजार 281 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये 73 हजार 650 जण बरे झाले आहेत.

इरान : पश्चिम एशियातील आठ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी आतापर्यंत 27 हजार 17 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 2 हजार 77 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 9 हजार 625 रुग्ण बरे झाले आहेत.

फ्रान्स : पश्चिमी युरोपीय देशापैकी एक असलेल्या फ्रान्समध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सहा कोटी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये अचानक आलेल्या रोगामुळे आतापर्यंत 1 हजार 331 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 हजार 253 जणांना संसर्ग झाला आहे. कोरनाचा संसर्ग झालेल्यापैकी 3 हजार 900 जण बरे झाले आहेत.

कोरनामुळे जगभरामध्ये 20 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. इटली, फ्रान्स, स्पेन आणि श्रीलंका या व्यतिरीक्त अमेरिकेतील अनेक राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात सॅनिटायझेशनचे काम सरु आहे.

You might also like