चोरट्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

बंद घराची टेहाळणी करुन, दरवाजा कडी-कोयंडा तोडून चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्यास अटक करुन त्याच्याकडून ८०.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण दोन लाख ४७ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’491b75bc-9d54-11e8-a29f-a7397eb1b49e’]

शुभम शिवानंद स्वामी (१९, रा. मु.पो. वडवळ, लातूर) याला अटक केली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, सुनील पिंजण, तपासी पथकाचे उपनिरीक्षक हरिष माने, अन्वर मोमीन, बिभीषण कण्हेरकर, धनराज किरनाळे, दादा पवार, हनुमंत राजगे, अशोक दुधवणे, बापू धुमाळ, रमेश गायकवाड, विक्रांत गायकवाड, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभिरे, शाम बाबा, नितीन गेंगजे व त्यांच्या पथकाने सापळा रचून स्वामी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याचे समोर आले. अधिक चौकशी केली असता त्याने घरफोडीचे पाच प्रकार केल्याचे उघडकीस आले. तपास वाकड पोलीस करत आहेत.