दरोड्याच्या तयारीतील आक्या बॉण्डची टोळी ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सीएनजी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार आक्या बॉण्डच्या टोळीला पोलीसांनी अटक केले आहे. ही कारवाई आज (रविवारी) पहाटे जाधववाडी येथे करण्यात आली.

सुमित उर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहोळ (19, रा. घरकुल, चिखली), अक्षय संदीप चव्हाण (19, रा. घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांच्या अन्य तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथे असलेल्या सीएनजी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत पाचजण आले आहेत. ते मोटारीमध्ये (एम एच 03 / ए एम 9659) दडून बसले असून योग्य वेळेची वाट पाहत आहेत, अशी माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार चिखली पोलिसांनी तात्काळ सापळा रचून पाच जणांना ताब्यात घेतले.

मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी कोयता, स्टीलचा पाईप, काळी बॅग, दोन लोखंडी कटावण्या, स्क्रू ड्रायवर, लोखंडी करवत, लोखंडी पक्कड, सुती दोरी, मिरची पूड अशी घातक शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी मोटार आणि शस्त्रे असा एकूण 5 लाख 2 हजार 30 रुपयांचा ऐवज जप्त केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like