पुण्यात भाजपकडून रोज सव्वा पाच कोटींचा घोटाळा, शिवसेनेचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिकेच्या वादात सापडलेल्या योजनांपैकी समान पाणीपुरवठा योजना, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) आणि नदीसुधार (जायका) या कामांच्या टेंडरची रक्कम प्रचंड चढ्या दराने आली होती. याबाबत विरोधकांनी आवाज उठविल्यानंतर या निविदा रद्द करण्यात आल्या. सत्ताधारी भाजपने पावणेतीन वर्षांत सुमारे 10 हजार कोटी रूपयांच्या तीनच निविदा काढल्या. म्हणजे सत्तेत येऊन 800 दिवस झालेल्या भाजपने रोज सव्वा पाच कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

पुणे महापालिकेच्या तब्बल दहा हजार कोटी रुपयांच्या निविदांबाबत विरोधाकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पुणेकरांचे साडेचार हजार कोटी रुपये वाचले आहेत. परंतु, या निविदा वाढल्या कशा, यावरून सत्ताधारी भाजप आणि अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी विधानसभा अधिवेशनात हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी केली होती.

यानंतर पुणे महापालिकेतल्या एचसीएमटीआर, जायका आणि कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदांची चौकशी करण्यासाठी पावले उचलण्यास राज्य सरकारने सुरूवात केली आहे. महापालिकेतल्या सत्ताधारी भाजपच्या या कारभारावरावर संशय व्यक्त केला जात असून निविदा हजारो कोटी रूपयांनी जास्त येणे ही गंभीर बाब असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पारदर्शक कारभार करत असल्याने निविदा रद्द केल्याचे म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?