home page top 1

ट्रक आणि स्कॉर्पिओच्या भीषण अपघातात ८ महिन्याच्या बाळासह ५ जणांचा मृत्यू

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – बुलढाण्यामध्ये ट्रक आणि स्कॉर्पिओच्या झालेल्या भीषण अपघातात ८ महिन्याच्या छोट्या बाळासह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात मेहकर तालुक्यातील डोनगाव रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजनी बुद्रुक येथे सोमवारी रात्री २ च्या सुमारास ट्रक आणि स्कॉर्पिओची जोरदार धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. अपघातामध्ये मृत झालेले सर्व जण बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील रहिवासी आहेत.

poअपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामुळे रस्त्यावर कोंडी निर्माण झाली होती. तसेच घटनास्थळावरून अपघाती वाहनं रस्त्याच्या बाजूला करण्यात आली आहे.

Loading...
You might also like