बाबा विश्वनाथांना ‘अर्पण’ करण्यासाठी 5 फूटी दुधी भोपळा घेऊन शेतकरी, म्हणाला – ‘मंदिराच्या फुलांपासून बनवलेल्या खतांची कमाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रंगभरी एकादशीला बाबा विश्वनाथ आणि माता पार्वतीच्या पालखी यात्रेत चढावा अर्पण करण्यासाठी एक शेतकरी ५ फूट लांबीचे दोन दुधी भोपळे घेऊन महंताच्या घरी पोहोचला. शेतकऱ्याच्या हातात एवढा मोठा दुधी भोपळा पाहून लोक आश्चर्यचकित झाले. शेतकरीही दुधी भोपळा घेऊन भोलेनाथांच्या मिरवणुकीत सामील झाला.

वाराणसीतील जक्खिनी खेड्यातील शेतकरी श्री. प्रकाश रघुवंशी या शेतकऱ्याने आपल्या शेतात या दुधी भोपळ्याचे उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्याने सांगितले की भोलेनाथांच्या आस्थेमुळे हा ५ फूट दुधी भोपळा भोलेनाथांना अर्पण करण्यासाठी तो आला आहे. शेतकर्‍याने सांगितले की, त्याच्याकडे ७ फूट लांबीचा दुधी भोपळा देखील आहे, परंतु जास्त गर्दीमुळे त्याला आणता आले नाही.

प्रकाश रघुवंशी या शेतकऱ्याने असा दावा केला की, आपल्या शेतात इतका लांब दुधी भोपळा तयार करण्यासाठी वापरलेले खत श्री काशी विश्वनाथ मंदिरातून निघणाऱ्या माळा आणि फुलांपासून तयार केले गेले होते आणि ते २ महिन्यांत हे यश मिळाले. या दुधी भोपळ्याचे वाण वाराणसीच्या स्थानिक बियांपासूनच तयार करण्यात आले आहे आणि बर्‍याचदा याचा वापर देखील करण्यात आला आहे. तसेच हर्बल खतापासून बनवलेल्या या दुधी भोपळ्याचे बरेच फायदे आहेत. प्रकाश रघुवंशी यांना याआधी शेतीसंबंधी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.