सेक्स रॅकेट चालवणाऱ्या पाच परदेशी महिला गजाआड

अलिबाग : पोलीसनामा आॅनलाईन-

इंटरनेटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलांना अलिबागमधून रायगडच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. यामध्ये पाच विदेशी काॅलगर्ल्सचा देखील समावेश आहे. एकाच वेळी पाच परदेशी महिलांना सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’08ab0e3a-90ad-11e8-8e4b-7d286f266e89′]

संदीपकुमार रवींद्रकुमार सिंह (वय-30) तर नितेश राजनंद सिंग (वय-40) यांच्यासह नरेश सुंदरलाल खाटील (वय-42)  ट्रॅव्हल्स एजंट व डॅफनी क्लेरा लिकन पॅपी (वय-60), दलाल यांसह पाच कॉलगर्ल महिलांना अटक करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंटरनेटचा वापर करुन हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती रायगडच्या गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार फोन करुन या परदेशी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

सेक्स रॅकेट चालवण्यासाठी दोन सोशल वेबसाईट तयार केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी बनावट कस्टमर्स तयार केले. त्यानुसार बनावट ग्राहकांनी अलिबाग येथील सेव्हन स्टार हाॅटेल रेसिडन्समध्ये काॅलगर्ल्सला बोलावलं. त्यानंतर पोलिसांनी या हाॅटेलवर छापा टाकला. या कारवाईत दलालासह इतर दोघांना अटक केली आहे.

यानंतर अटक  केलेल्या इसमांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुंबईतील एका रुमवर देखील छापा टाकला. या छाप्यात तीन महिलांना अटक करण्यात आली असून, दोन परदेशी महिलांचा यामध्ये समावेश आहे.
[amazon_link asins=’B077PVYCJW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f0a8641-90ad-11e8-bb18-29d09cb4807e’]
दरम्यान याप्रकरणी अटक केलेल्या काॅलगर्ल्स या कोलंबिया आणि दक्षिण अमेरिका येथील असल्याचे चाैकशीत पुढे आले असून, या काॅलगर्ल्स टुरिस्ट व्हिजावर भारतात दाखल झाल्या होत्या. तसेच यापूर्वी अटक केलेल्या या काॅलगर्ल्सनी बंगळुरु, पुणे, दिल्ली, हैद्राबाद, चंदिगढ या ठिकाणी सुद्धा देहव्यापार केल्याची कबुली दिली.