‘T – 20 वर्ल्ड कप’पुर्वीच टीम इंडियामध्ये ‘या’ 5 युवा खेळाडूंची ‘एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेत मालिकेत भारतीय संघाच्या सुमार कामगिरीमुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आगामी टी- 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. भारतीय संघाच्या एका देखील खेळाडूला या सामन्यात अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारतातील तरुण खेळाडूंना या फॉरमॅटमध्ये संधी देण्याची वेळ आली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे या वर्ल्डकपपर्यंत पाच तरुण खेळाडू भारतीय संघात पदार्पण करू शकतात.

 या पाच फलंदाजांमध्ये आहे लक्ष

1) ईशान किशन
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा ईशान किशन देखील भारतीय संघात खेळण्यासाठी तयार झाला आहे. त्यामुळे रिषभ पंत याच्या सुमार कामगिरीनंतर किशन हा भारतीय संघात पदार्पण करू शकतो. तसेच त्याला वर्ल्डकपमध्ये संधी मिळू शकते. त्याने भारतीय अ संघाकडून चांगली फलंदाजी केली आहे.

2) संजू सॅमसन
संजू सॅमसन याने भारताकडून एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला आहे. 2015 मध्ये त्याने भारताकडून एकमात्र टी-20 सामना खेळला आहे.तसेच आयपीएलमध्ये देखील त्याने राजस्थान रॉयल्सकडून चांगली कामगिरी केली आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध देखील त्याने शानदार ९१ धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो देखील पुन्हा संघात पुनरागमन करू शकतो.

3) शुभमन गिल
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा हा खेळाडू भारतीय कसोटी संघात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचबरोबर एकदिवसीय संघात देखील त्याला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता टी-20 मध्ये देखील खेळण्यासाठी तो सज्ज आहे.

4) श्रेयस गोपाळ
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या गोपाळने देखील उत्तम कामगिरी करून आपली दावेदारी पक्की केली आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्डकपमध्ये त्याची निवड होऊ शकते.

5) दिनेश कार्तिक
35 वर्षीय दिनेश कार्तिक देखील भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे आता त्याला संधी मिळते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : policenama.com