सिरम इन्स्टिटयुटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती कोविंद यांनी केले दु:ख व्यक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुण्यातील सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया मध्ये आज लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये चार पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. या घटनेचे दु:ख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट मध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये आज लागलेल्या आगीमुळे जीवीत हानी झाली त्यामुळे मी दु:खी आहे. या घटनेत मृतांच्या नातेवाईकांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेमध्ये जखमी झालेले लोक लवकर बरे होतील अशी मी प्रार्थना करतो. असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

सिरममध्ये आज दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग लागल्याचे समजताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे मनपाच्या अग्नीशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच 100 जवान घटनास्थळी दाखल झाले होते. सिरमच्या नवीन इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर आग लागली होती. तेथून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर पाच जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा केले दु:ख व्यक्त

पुणे शहरातील सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया येथे झालेल्या भीषण अपघातात जीवितहानी झालेली आहे. या आगिमध्ये मृत पावलेल्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे. या आगिमध्ये जखमी झालेल्यांले लोक लवकर बरे होतील अशी मी प्रार्थना करतो अशा शब्दात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.