कार स्वस्तात मिळवून देण्याच्या बहाण्याने पाच लाखाची फसवणूक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – कस्टम अधिकारी असल्याचे सांगून स्वस्तात कार मिळवून देण्याचा बहाणा करून एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणी विजय नागनाथ काटे (रा. दत्त मंदिर रस्ता वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश यादव (रा. कुर्ला गार्डन जवळ, मुंबई. मूळ रा. जाधववाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर), दशरथ कोकरे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याने जेएनपीटी मुंबई येथे कस्टम अधिकारी असल्याचे सांगून जेएनपीटी मुंबई येथे कस्टममध्ये जप्त झालेली कार खरेदी करून देण्याचे आमिष दाखवले. तर दशरथ याने एजंट असल्याचे सांगितले. दोघानी संगनमत करून विजय यांच्याकडून पाच लाख रुपये बँक खात्यावर टाकण्यास सांगितले. विजय यांनी सर्व पैसे दिले. मात्र विजय यांना कार न देता त्यांची फसवणूक केली. तपास वाकड पोलिस करीत आहेत.