तीन लाख रूपयांच्या बदल्यात दिल्या पाच लाखांच्या बनावट नोटा !

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – तीन लाखा रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचे अमिष दाखवून एकाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आज (शुक्रवार) एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने आपल्या इतर साथिदारांच्या मदतीने एका व्यक्तीला तीन लाखाच्या बदल्यात पाच लाखांच्या बनावट नोटा दिल्या.

तक्रारदार याने अकोला पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन नदीम अहेमद अब्दुल रशिद (रा. बाळापुरा) याला आज अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीने एका व्यक्तीला तीन रूपयांच्या बदल्यात तुला पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून तीन लाखांची रोख रक्कम दिली. त्या बदल्यात आरोपींनी त्याला पाच लाख रूपयांच्या बनावट नोटा देऊन त्याची फसवणुक केली. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी बाळापुरातील छोटा मोबीनपुऱ्यात राहणारा नदीम अहेमद अब्दुल रशिद याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.