सिध्दूंचा शिरच्छेद करणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस : बजरंग दल

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था 
काँगेस नेते आणि  पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिध्दु यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांना आलिंगन दिल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर यावर जोरदार टिका होत असतानाच आता बजरंग दलाने देखील यात पुढाकार घेतला आहे. सिध्दु यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस बजरंग दलाने जाहीर केले आहे.सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून बजरंग दलाचा आग्रा जिल्हाध्यक्ष संजय जाट याने सिध्दु यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ लाखांचे इनाम देण्यात येईल अशी घोषणा केली आहे. या व्हिडिओत जाट हा ५ लाखांचा चेक दाखवताना दिसतो.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’adcf87ab-a517-11e8-836a-bb024dda17b3′]

काय आहे व्हिडिओत –
सिध्दु हे विश्वासघातकी आहेत. त्यांचे कृत्य माफ करण्यासारखे नाही. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. गुरू गोविंद सिंग यांची शिकवण सिध्दु विसरले आहेत असे वाटते. जो आमच्या जवानांच्या मृत्यूस जबाबदार आहे, अशा शत्रू राष्ट्राच्या लष्कर प्रमुखाला ते अलिंगण कसे देऊ शकतात, असे जाट याने व्हिडिओत म्हटले आहे. सिध्दुकडून पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना अलिंगण दिल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वांना सिद्धू यांना धडा मिळावा असे वाटत आहे. ज्यांनी देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी आपल्या मुलाला गमावले आहे. अशा कुटुंबीयांना सिध्दुच्या या कृत्यामुळे धक्का बसला आहे. लोक सिध्दुच्या विश्वासघातकीपणाला कधीच माफ करणार नाहीत.
आग्रामध्ये सिध्दु यांना येण्यास बंदी असल्याचेही जाट याने म्हटले आहे. जर सिध्दु कधी आग्रा येथे आले तर चपलांनी त्यांचे स्वागत केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच सिद्धू यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी केली. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सिध्दु यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान , पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळय़ाला सिध्दु यांनी हजेरी लावली होती. परंतु त्यांचा हा दौरा वादात सापडला आहे. भाजपने थेट काँग्रेसवर हल्ला चढवत सिध्दु यांच्या पाकिस्तान दौऱ्याला ‘गुन्हा’ ठरविले.
नवज्योतसिंग सिद्धू यांचे स्पष्टीकरण –
पाकिस्तान भेटीनंतर  भारतात परतताच माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिध्दु यांचा पाकिस्तानबद्दलचा सूर बदलला. पाक सैन्यप्रमुख जनरल बाजवा यांची गळाभेट घेणे आणि पाकव्याप्त काश्मीर अध्यक्षांच्या शेजारी बसण्याबद्दल स्वतःच्या शैलीत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न सिद्धू यांनी केला. अतिथी या नात्याने आपण शिष्टाचारांचे पालन केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

[amazon_link asins=’B073Q5R6VR,B07CRGDR8L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c00f023d-a517-11e8-ac55-ef7ffd1e3d59′]

“रविवारी भारतात परतताच सिध्दु यांनी शपथविधी सोहळय़ात पाक सैन्यप्रमुख बाजवा यांची गळाभेट घेतल्याच्या वादाप्रकरणी स्पष्टीकरण दिले. जर कोणी माझ्यानजीक आला आणि आमची संस्कृती एक असून आम्ही गुरुनानक देव यांच्या ५५० व्या प्रकाशपर्वावेळी कर्तारपूर सीमा खुली करू असे म्हणत असेल तर मी आणखी काय करू शकलो असतो, असे प्रश्नार्थक स्पष्टीकरण त्यांनी दिले”.