‘अंदाधुंद’ गोळीबारात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका घरात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अमेरिका-मेक्सिको सीमेपासून 35 किमी अंतरावर असलेल्या पॅराडाइज हिल येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6.49 च्या सुमारास आम्हाला एक फोन आला. जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा गोळीबारात जखमी झालेले काही लोक आम्हाला आढळून आले. घटनास्थळावर एक तीन वर्षांचा लहान मुलगा, एक महिला आणि एक पुरुष मृतावस्थेत आढळले. जखमी अवस्थेत सापडलेल्या पाच आणि आणि नऊ वर्षांच्या दोन मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याशिवाय 11 वर्षांच्या एका मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी हा मृतांमधीलच एक असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेत गोळीबार होण्याच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. अमेरिकेत गन कल्चरविरोधात अनेक निषेध नोंदवले गेले आहेत, परंतु त्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like