सुट्टी ‘एन्जॉय’ करणार्‍या महिलेवर हॉटेलच्या कर्मचार्‍यांकडून ‘बलात्कार’, WhatsApp वर पाठवला ‘व्हिडिओ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुलीसोबत सुट्ट्या घालवण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. व्हाट्सअ‍ॅपवरून या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आला होता. इटलीच्या सोरेंटो या प्रसिद्ध शहरातील हा धक्कादायक प्रकार आहे.

ब्रिटनमधील केन्ट या ठिकाणी राहत असलेल्या ५० वर्षीय महीलेसोबत हॉटेलच्या स्टाफने बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. आरोपींनी हॉटेलमध्येच महिलेला ड्रिंकमधून नशीला पदार्थ दिला होता. पतीच्या मृत्यू नंतर महिला आपल्या मुलीसोबत फिरायला इटलीला आली होती. न्यायालयात ज्यावेळी याबाबत सुनावणी सुरु झाली त्यावेळी याबाबतची अधिक माहिती समोर आली आहे.

पाचही आरोपीना 9 – 9 वर्षांच्या कोठडीची मागणी यावेळी वकिलांनी केली आहे. फिर्यादी वकील एन्टोनिओ बार्बा यांनी न्यायालयात अशी मागणी केली की, आरोपींना अशी शिक्षा मिळावी ज्याचे सगळ्यांनी उदाहरण म्हणून दिले पाहिजे. रिपोर्टमध्ये आरोपींवर गुन्हेगार असल्याचा शिक्का मोर्तब झाला आहे.

महिला एक प्रसिद्ध रिसॉर्ट होटल एलिमुरी येथे थांबली होती आणि त्याच ठिकाणी ही घटना घडली. महिलेच्या फोनमध्ये दोन आरोपींचे फोटो होते त्यामुळे पोलिसांना तपासात मदत मिळाली. मात्र आरोपींनी या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. तसेच आलेला अहवाल देखील चुकीचा असल्याचे सांगितले आहे. याबाबत अजून न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

Visit : policenama.com

 

Loading...
You might also like