तब्बल 32 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर 5 महिन्याच्या बाळानं केली ‘कोरोना’वर मात

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसने पुर्णपणे प्रभावित झालेला देश ब्राझीलमध्ये पाच महिन्याचे बाळ कोरोना मुक्त झाले आहे. डॉम नावाचे हे बाळ एक महिन्यापासून कोमामध्ये होते, पण शेवटी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे त्या बाळाला नवीन जीवन मिळाले. जन्माच्या काही दिवसानंतर बाळाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या उपचारासाठी रियो डी जेनेरियोच्या प्रो-कार्डियको रुग्णालयात त्याला दाखल केले गेले होते. जिथे त्याला 54 दिवस ठेवले गेले होते आणि 32 दिवस तो कोमामध्ये व्हॅटिलेटरवर होता.

डॉमचे वडिल वैगनर एंड्रेड यांनी सांगितले की, त्याला श्वास घेण्यास समस्या येत होती. डॉक्टरांना वाटले की, हे बॅटरिअल इन्फेक्शन आहे पण जेव्हा औषध घेऊनही तब्बेतीमध्ये फरक दिसला नाही तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे कळाले की त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

सांगितले जात आहे की, वैगनर आणि त्यांची पत्नी डॉमसोबत एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यादरम्यान बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. डॉम पुर्णपणे बरा झाल्यामुळे त्याच्या परिवाराला दिलासा मिळाला आहे. डॉमची आई विवियन मोंटेइरो याला चमत्कार मानते. ते म्हणाले की, डॉमचे ठिक होणे आमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. जेव्हा आम्हाला माहित झाले की, आमच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली. आम्हाला कळत नव्हते की काय करावे. पण देवाने आमची प्रार्थना ऐकली.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डॉम आता पुर्णपणे बरा झाला आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून सोडण्यात येईल. डॉमच्या वडिलांनी सांगितले की, 14 जूनला त्यांचा मुलगा सहा महिन्यांचा होईल. आम्ही त्याचा वाढदिवस घरी सगळ्यांसोबत साजरा करु. ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरस खूप वेगाने पसरत आहे. हा लॅटीन अमेरिकी देश जागतिक महामारीचा एपीसेंटर बनला आहे. आत्तापर्यंत येथे कोरोनाचे 465,166 प्रकरणे समोर आली आहे आणि 27,878 लोकांचा मृत्यू झाला आहे. 12 महिन्यापर्यंत वयाच्या कमीतकमी 25 मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like