धक्कादायक ! पतीसोबत झालेल्या भांडणातून 5 महिन्याच्या गर्भवती महिलेची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत एका गर्भवती महिलेने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणामुळे तिने कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या महिलेच्या पतीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव संगीता आहे. तिने घराच्या गॅलरीमधून उडी घेत स्वतःचे जीवन संपवले. दिल्लीतील रोहिणी परिसरात हि घटना घडली असून पोलिसांनी तिचा पती गोविंद याला अटक केली आहे. उडी मारल्यानंतर गंभीर अवस्थेत महिलेला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हुंड्यासाठी छळल्याचा कुटुंबीयांचा आरोप
महिलेच्या कुटुंबीयांनी या महिलेच्या सासरच्या व्यक्तींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. तिने आत्महत्या करण्याआधी तिचा आपल्या पतीसोबत वाद झाला होता. मात्र पोलिसांना घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडली नसून मागील वर्षी या दोघांचे लग्न झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –