धक्कादायक ! 14 वर्षाची मुलगी 5 महिन्याची ‘गर्भवती’, लैंगिक ‘अत्याचार’ झाल्याचं उघड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – १४ वर्षाची मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचे लक्षात आल्यावर केलेल्या चौकशीत तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आला आहे. निगडी पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. व्यंकटेश जगदाळे (रा. विद्यानगर, चिंचवड) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. व्यंकटेश जगदाळे याने फिर्यादी महिलेच्या १४ वर्षाच्या मुलीशी सुमारे ७ ते ८ महिन्यांपूर्वी ओळख वाढवून तिला प्रेमात पाडले. तिला लग्नाचे आमिष दाखविले. चिंचवड येथील बर्ड व्हॅली गार्डन येथे वारंवार नेऊन तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केली. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.

तिच्या आईला संशय आल्याने त्यांनी आपल्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा ती ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. तिच्याकडे चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी बलात्कार तसेच पोस्को कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करुन व्यंकटेश जगदाळे याला अटक केली आहे.