तेलंगानामध्ये विहिरीत आणखी 5 मृतदेह सापडले, एकाच कुटुंबातील 6 सदस्यांचा मृत्यू, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

वारंगल : वृत्त संस्था – तेलंगानामध्ये एका विहिरीत नऊ लोकांचे मृतदेह मिळाल्याच्या घटनेचे रहस्य आणखी गडद होत चालले आहे. यापैकी सहा व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. चार लोकांचे मृतदेह गुरूवारी आणि पाच लोकांचे मृतदेह शुक्रवारी सापडले होते. पिशव्या बनवण्याचे काम करणारी 48 वर्षीय एक व्यक्ती आणि त्याच्या परिवारातील अन्य तीन सदस्यांचे मृतदेह गोरेकुंटा गावाच्या विहिरीत सापडले आहेत.

यानंतर पाच आणखी मृतदेह याच विहिरीत सापडले. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबप्रमुखाच्या दोन मुलांचे मृतदेहसुद्धा शुक्रवारी सापडले. वारंगलचे पोलीस आयुक्त वी रविंद्र यांनी सांगितले की, एकाच कुटुंबातील 6 लोक आणि त्यांचा एक मित्र तसेच दोन अन्य व्यक्तींचे मृतदेह विहिरीतून काढण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात पोलिसांनी हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

त्यांनी सांगितले की, मृतदेहांवर कोणत्याही जखमा नाहीत. पोस्टमार्टमनंतर खरे कारण स्पष्ट होईल. सूत्रांनी सांगितले की, कुटुंब प्रमुखाने आपल्या एका मित्राला पिशव्या बनवण्याचे जास्त काम आल्याचे सांगून बोलावून घेतले होते. तो अन्य ठिकाणी काम करत होता.

त्यांनी सांगितले की, सध्या आत्महत्येचा प्रकार नोंदवण्यात आला आहे. जो पुढे तपासानुसार बदलला जाऊ शकतो. मृत 48 वर्षीय व्यक्ती सुमारे 20 वर्षापूर्वी पश्चिम बंगालहून येथे आली होती आणि येथेच स्थायिक झाली होती.

You might also like