Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरस भारतात पोहण्याचा ‘हा’ घटनाक्रम, आतापर्यंत 8 रूग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनसह जगातील अनेक देशांमध्ये हजारो लोकांचा बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूमुळे राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे. या प्राणघातक विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारसह आरोग्य मंत्रालयही सूक्ष्म पातळीवर तयारी करत आहे.

भारतात कोरोना विषाणूने शिरकाव केल्याच्या वृत्ताने लोकांना चिंतेत टाकले आहे. सोमवारी दिल्लीत कोरोना विषाणूचा अजून एक रुग्ण आढळून आला. याचा प्रभाव दिल्लीपासून नोएडापर्यंत पोहोचला आहे.

इटलीवरून आलेल्या ज्या व्यक्तीस कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले त्याने आग्रा मध्ये एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत नोएडाच्या एका खाजगी शाळेतील २ मुलं आणि ५ लोकांचा समावेश होता. या वृत्तामुळे नोएडा आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

सीएमओ अनुराग भार्गव स्वत: शाळेची चौकशी करण्यासाठी त्यांच्या पथकासह पोहोचले. शाळेतील जे पाच लोक कोरोना झालेल्या रुग्णासोबत पार्टीत गेले होते त्या पाच जणांची ग्रेटर नोएडा येथील जिम्स आयुर्वेद कॉलेजमध्ये तपासणी केली जाईल. कोरोनाची काही लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य विभागाला कळविण्याचे निर्देश नोएडाच्या सीएमओने शाळेला दिले आहेत.

अनुमान लावले जात आहे की शाळेत शिकणार्‍या एका मुलास कोरोना विषाणूची लक्षणे असू शकतात. नोएडाच्या एका कुटुंबात कोरोना विषाणूची लक्षणे दिसण्याची भीती आहे.

कोरोना विषाणूमुळे नोएडा मध्ये अलर्ट घोषित करण्यात आला आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या जवळपास १००० हून अधिक कंपन्यांना आरोग्य विभागाने नोटीस देत सांगितले की त्यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना परदेशातून आगमनाची माहिती दिली पाहिजे.

इराण, सिंगापूर, चीनसह १३ देशांमधून परत आलेल्या लोकांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. आग्रा येथे नमुना चाचणी दरम्यान विषाणूची सहा प्रकरणे आढळली आहेत. हे ते लोक आहेत जे दिल्लीच्या कोरोना रूग्णाच्या संपर्कात आले. त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एअर इंडियाने व्हिएन्ना ते दिल्ली फ्लाईटच्या सर्व १० क्रू सदस्यांना आयसोलेशन मध्ये टाकले आहे. विशेष म्हणजे ही तीच फ्लाइट आहे ज्यावर ती व्यक्ती चढली होती, ज्याची खात्री पटली आहे की या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाटकच्या बसमध्ये प्रवाशांच्या तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

रुग्णालयांपासून ते विमानतळांपर्यंत या विषाणूची दहशत पसरली आहे. कोरोना विषाणूचा एकही माणूस गर्दी आणि लोकसंख्येमध्ये येऊ नये म्हणून दिल्ली विमानतळावर परदेशातून येणाऱ्या रुग्णांची बारकाईने तपासणी केली जात आहे.

तेलंगणामध्येही कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे तेथेही प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत. स्क्रीनिंगचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारची एक टीम हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली आहे. दरम्यान या टीमकडून संपूर्ण स्क्रीनिंग प्रक्रिया आणि त्याच्या संभाव्यतेचे बारकाईने पुनरावलोकन केले जात आहे.

देशभरातील विमानतळ आणि बंदरांवर कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. २१ विमानतळांवर परदेशातून येणार्‍या लोकांची स्क्रीनिंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १२ मोठ्या आणि ६५ छोट्या बंदरांवर अशीच व्यवस्था केली गेली आहे.

आतापर्यंत ५ लाख ५७ हजार ४३१ लोकांची विमानतळांवर स्क्रीनिंग करण्यात आली आहे. तर बंदरांवर १२,४३१ लोकांची स्क्रीनिंग करण्यात आली आहे. गरज नसल्यास लोकांनी इराण, इटली, उत्तर कोरिया आणि सिंगापूरचा प्रवास टाळावा, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

इराण आणि इटलीमधून भारतीयांना परत आणण्यासाठी संबंधित देशांच्या सरकारशी चर्चा सुरू आहे. ज्या पद्धतीने चीन आणि बर्‍याच देशांमध्ये कोरोनामूळे नुकसान झाले आहे, ते पाहता कोरोनाला हलक्यात घेणे उचित ठरणार नाही कारण थोड्याशा निष्काळजीपणामूळे मृत्युजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पुष्टी केली की देशात कोरोनामुळे ग्रस्त दोन रूग्णांची पुष्टी झाली आहे. एक रुग्ण दिल्लीचा आणि दुसरा तेलंगणात असल्याचे त्याने सांगितले. दिल्लीचा रुग्ण इटलीला गेला होता. तर तेलंगणामधील कोरोना विषाणूमुळे पीडित असलेला एक रुग्ण दुबईला गेला होता. अशाप्रकारे भारतात कोरोना रूग्णांची संख्या वाढून पाच इतकी झाली आहे.

कोरोनाबद्दलची चिंता फक्त दिल्ली आणि तेलंगणापुरतीच मर्यादित नाही. तर राजस्थानातही कोरोनाचे लक्षण असलेला एक रुग्ण समोर आला आहे. राजस्थानमध्ये सापडलेला कोरोनाचा संशयित रुग्ण इटलीहून आलेल्या २० जणांच्या गटामध्ये होता. २९ फेब्रुवारी रोजी त्याच्या तब्येतीची तपासणी केली असता हा अहवाल नकारार्थी परत आला, परंतु कालचा अहवाल सकारात्मक आल्याने अंतिम तपासणीसाठी हा नमुना पुणे येथे पाठविण्यात आला आहे. या संशयित रुग्णाला जयपूरच्या सवाई मान सिंग हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे.