देलवडी येथील युवकाच्या खून प्रकरणी पाच जणांना अटक

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन
अब्बास शेख

दौंड तालुक्यातील देलवडी येथील स्वप्नील ज्ञानदेव शेलार या तरुणाचा खून करून फरार झालेल्या पाच संशयित आरोपींना अटक करण्यात यवत पोलिसांना यश आले असून आरोपींना त्वरित अटक करण्यात यवतचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, सहाय्यक पो.नि.कानगुडे, पो.उप.नि.लकडे पो.ना.संभाजी कदम, पोटे, पालखे, गणेश झरेकर, हेमंत कुंजीर या टीमने सहभाग घेतला.
[amazon_link asins=’B01MU4PM6P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df44cfa4-998c-11e8-b82b-d5face17329a’]

देलवडी ता दौंड येथील स्वप्नील ज्ञानदेव शेलार याच्या खून प्रकरणी यवत पोलिसांनी सोमनाथ विष्णू शेलार, विशाल उर्फ बाबू शिवाजी मेमाणे, रणजित उर्फ बाबू बाळासो वांझरे तिघेही राहणार देलवडी ता.दौंड बबलू विशाल डेंगळे बिबवेवाडी पुणे व अनिल उर्फ सुनील अरुण शितोळे रा.हडपसर, पुणे या पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावातील स्वतःचे वर्चस्व आणि पैशांची देवाण-घेवाण या कारणामुळे हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.

रविवार दिनांक ५ ऑगस्ट २०१८ रोजी सदर आरोपींनी साडेनऊ च्या दरम्यान मयत स्वप्नील शेलार हा आखाडाचे जेवणाचा डबा घेऊन आरोपींसोबत जेवायला बाहेर आला होता. यावेळी आरोपी व मयत यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यवसन दगडाने ठेचून व धारदार हत्त्याराने वारकरून निर्घृण खून करण्यात झाले.
[amazon_link asins=’B01DQM1KCK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e4825d97-998c-11e8-93f0-b1de872054cc’]

अशी माहिती यवत पोलीसांनी दिली असून या प्रकरणी अधिक तपास यवतचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहेत.