पुणे : महिलेच्या TikTok व्हिडीओवर अश्लिल कमेंट, 5 जणांवर FIR

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – टिकटॉकचे वेड तरुणांपासून वृद्धांपर्य़ंत आहे. एका महिलेने टिकटॉकवर अपलोड केलेल्या व्हिडीओला अश्लिल कमेंट करण्यात आली. तसेच या महिलेच्या व्हिडीओला अश्लिल गाणे लावले. याप्रकरणी पाच जणांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय साहेबराव म्हसे (रा. जुनी सांगवी), गोविंद पाटील (रा. हिंगोली), सत्यवान झांजे (रा. कात्रज, पुणे), रोहन कणसे आणि सूरज जाधव (रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एक जुलैपासून वेळेवेळी महिलेच्या टिकटॉक आणि व्हॉटस्ॲपवर घडली आहे.
पीडीत महिलेने टिकटॉकवर अपलोड केलेल्या व्हिडीओला अक्षय म्हसे याने अश्लिल कमेंट केली. तर व्हॉटस्ॲपवर शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्याने आपल्या ओळखीच्या इतर चौघांना महिलेचा मोबाईल नंबर देऊन अश्लिल मेसेज व धमकी देण्यास सांगितले. एवढेच नाही तर अक्षयने महिलेच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले. यावर तो तरुणींनी अपलोड केलेल्या व्हिडीओला एडीट करून अश्लिल गाणे टाकून तो व्हिडीओ टिकटॉकवर अपलोड केला.

आरोपी अक्षय हा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने वाकड येथे राहणाऱ्या 29 वर्षीय महिलेच्या व्हिडीओवर कमेंट केली होती. त्यावर त्याने तुझा पत्ता सापडला असून लवकरच माझी टीम तुझ्या घरी येणार असल्याची धमकी दिली. तसेच आरोपी गोविंद पाटील याने आपल्या टिकटॉक अकांऊटवरून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
असून सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –