जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दोन कारच्या भीषण अपघात सात जणांचा मृत्यू

लोणावळा : पाेलीसनामा ऑनलाईन

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये दाेन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास कार्ला जवळ झाला, अपघातातील जखमींना खाजगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं आहे. अपघातातील मृत पुणे, पिंपरी चिंचवड येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

राजीव जगन्नाथ बहिरट (वय ५२), साेनाली राजीव बहिरट (वय ४६), जान्हवी राजीव बहिरट (वय २०),जगन्नाथ चंद्रसेन बहिरट (वय ८३) अशी अपघातातील मृतांची नावे असुन ते सर्वजण रा. सर्वे नं. ५२ कैलास नगर, बीटी कवडे राेड, मुंढवा,पुणे-३६ येथील रहीवासी अाहेत.
[amazon_link asins=’B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f99d59aa-8820-11e8-86db-e9c75aa1a7e1′]

मिळालेल्या माहितीनुसार, सेन्ट्रो आणि स्विफ्ट चा समोरासमोर झालेल्या अपघातात ऐकून सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. मृतात एक महिला असून चार पुरुष आहेत. स्विफ्ट ही मुंबईच्या दिशेने जात होती,तर सेन्ट्रो पुण्याच्या दिशेने. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक ओलांडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर जाऊन सेन्ट्रो गाडीला समोरून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात सेन्ट्रो मधील दोन तर स्विफ्ट मधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. स्विफ्ट मध्ये लहान मूल असल्याची माहिती मिळत आहे.अद्याप अपघातातील मृतांची नावे समजली नाही.