मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पुल कोसळला ; ५ जणांचा मृत्यू ३६ जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला आहे. सध्या या ठिकाणी पुलाच्या स्लॅबचा सांगडा हटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपूर्वा प्रभू (वय- ३५), रंजना तांबे (वय- ४०), जाहिद सिराज खान (वय – ३२), सारिका कुलकर्णी, तपेंद्र सिंह असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३६ जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपूर्वा प्रभू (वय- ३५), रंजना तांबे (वय- ४०), जाहिद सिराज खान (वय – ३२) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृत्यू झालेल्या दोघांची नावे अद्याप समजू शकले नाही. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

या पुलाच्या दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र, या पुलाचे ऑडिट झाले नसल्याचे स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे सानप यांनी सांगितले.

सानप म्हणाल्या, लोअर परळचा ब्रिज कोसळला त्यानंतर सगळ्या पुलाचं ऑडिट झालं होतं मात्र, या पुलाचं ऑडिट झालेलं नव्हतं. याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी ही रेल्वेची आहे. यासंबंधी आधीचे नगरसेवक गणेश सानप यांनी रेल्वे प्रशासनाशी याप्रकरणी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही यावर अद्याप काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे त्या म्हणाल्या.

ह्याहि बातम्या वाचा –

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पुल कोसळला ; ४ जणांचा मृत्यू ३४ जखमी  मयतांची नावे आणि इतर माहिती वाचा सविस्तर

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ फूट ओव्हर ब्रिज कोसळला, दोघांचा मृत्यू : 23 गंभीर जखमी

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us