लाच प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरक्षकासह पाचजण निलंबित

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

भारत राखीब बाटालियनच्या खेळाडू पोलिसांकडून ४० हजारांची लाच घेणेऱ्या पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. सहायक समादेशक मनोहर नारायण गवळी (वय 58, रा. टेंबलाईवाडी) यांचा अहवाल शासनाला पाठविण्यात आल्याचे राज्य राखीव दलाचे महानिरीक्षक डॉ. सुरेश मेखला यांनी सांगितले. बटालीयन मधील पाच जण निलंबित झाल्याने त्यांच्या जागी पुण्यातील उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b8b0f659-8bfa-11e8-9a31-e927d58b7191′]

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर श्रीपत सकट (56, रा. कसबा बावडा, ता. करवीर), प्रमुख लिपिक राजकुमार रामचंद्र जाधव (53, लखनापूर, चिक्‍कोडी, सध्या रा. प्रिन्स शिवाजी, कसबा बावडा), सहायक फौजदार रमेश भरमू शिरगुप्पे (33, संभाजीपूर, जयसिंगपूर, शिरोळ), सहायक फौजदार आनंदा महादेव पाटील (36, बस्तवडे, कागल), पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण प्रधान कोळी (28, अब्दुललाट, शिरोळ) अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मंगळवारी सर्वांना भारत बटालियनच्या कार्यालयात लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते.

कसबा बावडा येथील भारत बटालियन क्र. 3 मधील लिपिकासह वरिष्ठ निरीक्षकापर्यंत सर्वांची उचलबांगडी झाल्याने कार्यालय रिकामे झाले. जवानांची हजेरी घेणाराच लाच प्रकरणात अडकल्याने हजेरीला विलंब होऊ लागला. यासाठी पुण्याहून उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याला पाठविण्यात आले आहे.