राजापूरमध्ये भीषण कार अपघात; पाचजण ठार

रत्नागिरी : वृत्तसंस्था

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरजवळ कुवे येथे इको कार आणि खासगी आराम बस यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने इको कारमधील पाचजण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले. कारमधील सर्वजण मुंबईकडून राजापूर तालुक्यातील कोंड्ये या आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात होते.

प्रियांका काशीराम उपळकर (वय २९), पंकज हेमंत घाणेकर (वय १९), भार्गवी हनुमंत माजळकर (६ महिने), मानसी हनुमंत माजळकर (वय ३०) आणि एक अनोळखी पुरूष असे पाचजण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात मंगेश काशीराम उपळकर (वय २६), लहू काशीराम उपळकर (वय १८), अंकुश काशीराम उपळकर (वय १८), हनुमंत शंकर माजळकर (वय ३५), प्रमोद प्रभाकर माजळकर, आराम बस चालक नितीन शांताराम जाधव (वय ३४) हे या अपघातात जखमी झाले आहेत.

मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत द्या: हायकोर्ट
राजापूरजवळच्या वाकेडघाटीत आज सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईकडे जाणारी खासगी अराम बस आणि गोव्याकडे जाणाऱ्या इको कारची समोरासमोर टक्कर झाली. त्यात इको कारचा चेंदामेंदा झाला असून या कारमधील पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत. अपघाताचं वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान, या अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

[amazon_link asins=’B008V6T1IW,B07CLPZMT2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’36be6353-b5a8-11e8-8d36-e178ed54fc12′]