IPL 2020 : 99 धावा करूनही किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पराभवाचे कारण ठरला क्रिस गेल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएल 2020 च्या 50व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला 7 विकेटच्या मोठ्या अंतराने हरवले. पहिली फलंदाजी करत पंजाबने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 185 धावांचा मोठा स्कोअर उभा केला, परंतु राजस्थानने अवघ्या 17.3 ओव्हरमध्ये हे लक्ष्य मिळवले. इतका मोठा स्कोअर करूनही पंजाबचा एकतर्फी पराभव झाला, ज्याची अनेक कारणे होती. पंजाबच्या पराभवाची काही महत्वाची कारणे होती, त्यामध्ये क्रिस गेलसुद्धा सहभागी आहे.

खुपच खराब गोलंदाजी
पंजाबच्या खराब गोलंदाजीने पुन्हा एकदा त्यांचे नुकसान केले. मागील पाच मॅचमध्ये पंजाबने आपली गोलंदाजी खुप सुधारली होती. त्यांच्या लागोपाठच्या विजयापाठीमागे त्यांची गोलंदाजीच होती. परंतु राजस्थान रॉयल्सच्या विरूद्ध पुन्हा एकदा पंचाबची गोलंदाजी आपली लाइन आणि लेंग्थ हरवून बसली. अर्शदीप सिंहने 3 ओव्हरमध्ये 34, शमीने 3 ओव्हरमध्ये 36, एम अश्विनने 4 ओव्हरमध्ये 43, क्रिस जॉर्डनने 3.3 ओव्हरमध्ये 44 धावा दिल्या.

टॉस आणि अबुधाबीचे हवामान
किंग्ज इलेव्हन पंजाबला टॉस हरणे सुद्धा महागात पडले. राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी निवडली आणि पंजाबचा कर्णधार केएल राहुलला सुद्धा हेच हवे होते. अबु धाबीमध्ये रात्रीच्या वेळी दव पडत आहे, ज्यामुळे नंतर फलंदाजी करणे जास्त सोपे आहे. याच कारणामुळे राजस्थानच्या फलंदाजांनी सहजपणे 186 धावांचे आव्हान पार केले.

क्रिस गेलचा फिटनेस
क्रिस गेलने पंजाबसाठी 63 चेंडूत 99 धावा जरूर बनवल्या, परंतु तो सुद्धा टीमच्या पराभवाचे एक कारण ठरला. क्रिस गेलने 8 षटकार आणि 6 चौकार मारले. परंतु, त्याने अनेक सिंगल आणि 2-2 धावा सोडल्या, पंजाबच्या फलंदाजांनी 40 पेक्षा जास्त डॉट चेंडू खेळले, हेच कारण होते की, पंजाबचा स्कोअर 200च्यापुढे गेला नाही. नंतर कर्णधार केएल राहुलने सुद्धा चांगल्या खेळपट्टीवर अवघ्या 112 च्या स्ट्राइक रेटने 41 चेंडूत 46 धावा बनवल्या.

मयंक अग्रवालची कमतरता जाणवली
पंजाबला राजस्थानच्या विरूद्धच्या महत्वाच्या सामान्यात मयंक अग्रवालची कमतरता जाणवली. मयंक अग्रवाल अनफिट आहे आणि त्याच्या जागी मनदीप सिंह ओपनिंगसाठी उतरत आहे.

संजू सॅमसन आणि स्टोक्सची तूफान फलंदाजी
खेळपट्टी कितीतही चांगली असली तरी त्यावर चांगली गोलंदाजी करणे सुद्धा जरूरी असते. स्टोक्स आणि सॅमसनने पंजाबच्या गोलंदाजांच्या विरूद्ध निर्धास्त फलंदाजी केली. दोघांनी आपले शॉट्स खेळले आणि राजस्थानचा रनरेट 10 रन प्रति ओव्हरपेक्षा कमी होऊ दिला नाही. हेच कारण आहे की, टीमने अवघ्या 17.3 ओव्हरमध्ये 186 चे लक्ष्य प्राप्त केले.