महाराष्ट्रावर अन्याय ; मुंबई विमानतळाचे ५ स्लॉट गुजरातसाठी वळविले

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई विमानतळावर देश-विदेशातील अनेक शहरांतून विमाने उतरतात. ट्राफिकींग जास्त असल्याने येथे अनेकदा जागा उपलब्ध होत नाही. तरीसुद्धा मुंबईसाठी असलेल्या एकुण आठ स्लॉटपैकी पाच ते सहा स्लॉट गुजरातसाठी वळविण्यात आल आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी केला.

नांदेड-दिल्ली विमानसेवेस प्रारंभ झाला असून यानिमित्ताने खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड विमानतळावर आयोजित समारंभानंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण शहरात २२ पेक्षा जास्त विमानतळ आहेत. या सर्व विमानतळांना हवाई सेवेच्या माध्यमातून मुंबईशी जोडता आले पाहिजे. जळगाव, नाशिक, गोंदिया, कोल्हापूर, सोलापूर या शहरासंह प्रत्येक महत्त्वपूर्ण शहरास जोडणारी विमानसेवा सुरु झाल्यास मुंबईतील उद्योजक या शहरात गुंतवणूक करतील. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळणे शक्य होईल. परंतु मुंबईच्या वाट्याला आलेले स्लॉट गुजरातकडे वळवून एकप्रकारे महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आला आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्राला हवाई सेवेने जोडणे अधिक गरजेचे आहे.
दळण-वळण साधनांचा विस्तार झाल्यास त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे. नेहमी विरोध करणारे सर्व राजकीय पक्षांचे नेते विमानाने प्रवास करण्यासाठी का होईना एकत्र येतात. किमान विमानसेवेत तरी राजकारण येता कामा नये, असे चव्हाण म्हणाले.

राजगुरुनगर कारागृहातून पळालेल्या कुख्यात गुंडाचा कर्जतमध्ये खुन