जयपूरला ‘या’ रिसॉर्टमध्ये थांबले होते काँग्रेसचे आमदार, खर्चाची माहिती झाल्यावर ‘आश्चर्य’चकित व्हाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी मुंबईपासून दिल्ली पर्यंत हालचाली सुरू आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सरकार बनवण्यासाठी चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा सफल होण्याआधीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. आताही तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. या राजकीय ओढाताणीत आमदारांना घोडेबाजारापासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना जयपूरच्या फाईव्ह स्टार ब्यूना विस्ता रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं.


काँग्रेसनं या 5 स्टार हॉटेलमध्ये एकूण 52 रूम बुक केल्या होत्या. प्रत्येकाची किंमत 19 हजार रुपये आहे. हॉटेलचा आढावा घेतल्यानंतर लक्षात आलं की, कशा प्रकारच्या आलिशान रुम होत्या. शानदार स्पा ते ऐशो आरामाची प्रत्येक सुविधा ब्युना विस्ता रिसॉर्टमध्ये होती. हॉटेलच्या भव्य रूमचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही याचा अंदाज येईल. प्रत्येक खोलीसह एक लॉन. प्रत्येक खोलीला एक स्विमिंग पूल आहे. संपूर्ण खोली टचने ऑपरेट केली जात होती. बाथरूमचे नळदेखील गोल्ड प्लेटेड होते. रिसॉर्टचं नावचं स्पा रिसॉर्ट आहे.

काँग्रेसचे सर्व 44 आमदार या हॉटेलमध्ये 5 दिवस थांबले होते. हॉटेलच्या जीएमने याबाबतीत बोलताना सांगितले की, “प्रत्येक खोलीचं एक दिवसाचं भाडं 19000 रुपये आहे. प्रत्येक खोलीला अटॅच स्पा आहे.”


या हॉटेलच्या मालकाचं नाव जॉन लुक आहे आणि ते फ्रान्सचे रहिवासी आहेत. ते म्हणाले की, “आम्ही पाहुण्यांना चांगल्या प्रकारे ठेवलं आणि तेही चांगल्या प्रकारे राहिले.” त्यांनी काँग्रेसनं किती पैसे दिले हे सांगणं टाळलं. असं म्हटलं जात आहे की काँग्रेसने एवढा खर्च कुठून केला. काँग्रेस पक्षानं सांगितलं आहे की, आम्ही हा सगळा खर्च केला आहे.” काँग्रेसचे महेश जोशी म्हणाले की, “आमदारांनी स्वत: त्यांचा खर्च केला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like