खुशखबर ! आता हॉटेलमध्ये नाही लागणार ‘हा’ चार्ज, सामान्यांना मोठा ‘दिलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सामान्य नागरिकांना लवकरच केंद्र सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून दिलासा मिळणार आहे. अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात सेवाकरांच्या नावाखाली लूट करण्यात येते. यामुळे सामान्य नागरिक हॉटेलमध्ये जेवण करायला जात नाहीत. मागील काही दिवसांपूर्वी अनेक अभिनेत्यांनी देखील  खाद्यपदार्थांवर अवाजवी भाव लावल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर खाद्य मंत्रालयाने यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले  होते.

मात्र आता यापुढे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ग्राहकांकडून अवाजवी दर आकारले जाणार नाहीत. कारण आता यासाठी त्यांना केंद्र सरकारला उत्तर द्यावे लागणार आहे. काल केंद्रीय अन्न आणि ग्राहक सरंक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांवर या हॉटेल्सकडून आकारण्यात येणाऱ्या दरांवर चाप लावण्यात येणार आहे. या वस्तूंवर जर त्यांनी पुन्हा  ओव्हरचार्ज आकारला तर त्यांना यासाठी केंद्र सरकारला तसेच अन्न मंत्रालयाला उत्तर द्यावे लागणार आहे.

लवकरच बनवला जाणार कायदा

पुढे बोलताना पासवान यांनी सांगितले कि, या संदर्भात लवकरच सरकारकडून कायदा बनवला जाणार असून राहुल बोस याच्या संदर्भात बोलताना त्यांनी हे विधान केले. काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोस यांच्याकडून चंदीगडमधील एका पंचतारांकित हॉटेलने दोन केळ्यांसाठी ४४२ रुपये बिल आकारले होते. त्यांनी म्हटले कि, हि खूप गंभीर बाब असून  MRP पेक्षा जास्त रक्कम कुणीही आकारू नये. त्यासाठी सरकार लवकरच नवीन कायदा बनवणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त